निपाणी : वर्षभर पाण्याचे ‘नो टेन्शन’ जवाहर तलावात ४५ फूट पाणी

निपाणीत जवाहर तलावात ४५ फूट पाणी पातळी टिकून, गतवर्षीपेक्षा जास्त साठा
निपाणी : वर्षभर पाण्याचे ‘नो टेन्शन’ जवाहर तलावात ४५ फूट पाणी
sakal

निपाणी : जून-जुलै या दोन महत्त्वाच्या महिन्यांतच दांडी मारून पावसाने निपाणीकरांचा जीव टांगणीला लावला. त्यानंतर काही दिवसांत मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव काठोकाठ भरला आहे. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा आहे. तलावात ४५ फूट पाणी पातळी टिकून असून वर्षभर शहरवासीयांना पाण्याचे ‘टेन्शन’ नाही.

निपाणी : वर्षभर पाण्याचे ‘नो टेन्शन’ जवाहर तलावात ४५ फूट पाणी
कोल्हापुरात उद्या बंदी आदेश लागू: असा असेल किरीट सोमय्यांचा दौरा

जुलैच्या पंधरवड्यात तलावांमध्ये ७० टक्केच जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तलाव क्षेत्रात चांगला जलसाठा होऊ लागला. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली. पावसाळी चार महिने असेच चित्र राहिल्याने टेन्शन होते. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे तलावात ९९.२२ टक्के जलसाठा आहे.

परिणामी वर्षभर निपाणीकरांना पाण्याची चिंता करावी लागणार नाही. पाणीपातळी कायम राखण्यासाठी वेदगंगेच्या पाण्याचा उपसा जॅकवेलद्वारे सुरू केला आहे. शहर व उपनगरांतील सर्व भागांमध्ये २४ तास पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी रोज नळाला चोवीस तास पाणीपुरवठा होत. त्या पाण्याचा मोठा अपव्यय होत.

जवाहरलाल तलावातील ७५ एचपीच्या २ व ९५ एचपीच्या दोन्ही मोटारी सुरू आहेत. नव्याने बसविलेले दोन टीसी मात्र केबल खराब झाल्याने बंद आहेत. शहराच्या झोन २ भागांतील बिरदेवनगर, बडमंजी प्लॉट, लेटॅक्स कॉलनी, पंतनगर, शिरगुप्पी रोड, आदर्शनगर भागाला २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. अन्य भागाला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

मोटारी लावण्यावर कारवाई व्हावी

शहर व उपनगरांच्या सर्व भागाला एकाच वेळी चोवीस तास पाणीपुरवठा करता येऊ शकतो का, याची चाचपणी जैन इरिगेशनकडून होत आहे. अनेक भागातील नागरिक नळाच्या मोटारींद्वारे पाणी खेचून वापर करत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com