esakal | निपाणी : चोरीचे दागिने घेतल्याच्या संशयावरून व्यावसायिकांची चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

nipani

निपाणी : चोरीचे दागिने घेतल्याच्या संशयावरून व्यावसायिकांची चौकशी

sakal_logo
By
राजेंद्र हजारे

निपाणी : पुण्यातील ६० लाखाच्या चोरी प्रकरणातील दागीने निपाणीत विकल्याचे संशयीत चोरटया महिलेने सांगितल्याने पुणे पोलिसांनी निपाणी पोलिसांच्या सहकार्याने शहरातील तीन ते चार सोन्याच्या दुकानात अचानक चौकशी सत्र राबविले. तर काहींना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस दिल्याने परिसरातील सुवर्णकारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांनी संशयीत महिलेला सोबत घेवून आल्याने व तिनेच दुकाने दाखविल्याने पुणे (वानवडी) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत जाधव व सहकारयांनी दुकानदारांकडे चौकशी चालविली होती.

हेही वाचा: सहकारनगरमध्ये पारंपरिक पद्धतीने विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

पुणे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरकामाची गरज असल्याचे भासवून चार दिवस काम करून संधी साधून घरकाम घरातील मंडळींना गुंगीचे औषध महिला देत होती. रात्री घरातील सर्वजण झोपल्यावर दागिने व किंमती वस्तू घेवून पोबारा करण्याचा सपाटा शांती चद्रन (वय ४३ रा. तिरूअन्नामलाई, तामिळनाडू) येथील या संशयीत महिलेना लावला होता. २०१८ पासून पुणे परिसरातील ९ घरे फोडल्याचा पोलिसांकडे आतापर्यंत उलगडा झाला आहे. ती अनेक ठिकाणी मराठी नांवे लावून गरीब असल्याचा बहाणा करून घरकाम मिळवित होती. त्यानंतर ओळखीसाठी कागदपत्रे मागितल्यानंतर दोन दिवसात देतो असे सांगून चार दिवस घरकाम करीत होती.

काम करताना घरातील किंमती ऐवजांची माहिती घेवून पाणी अथवा जेवणातून संबंधित घरच्या लोकांना गुंगीचे औषध देवून घरातील दागिने, साहित्य घेवून पळ काढत होती. ओळखीची कागदपत्रे नसल्याने तीचा शोध घेणे कठीण झाले होते. ८ ऑगष्टला घोरपडी सोपानबाग येथील मिडटाऊन येथील ६० वर्षाच्या महिला व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध देवून कपाटातील रोख रक्कम घेवून पोबारा केला होता.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

यावेळी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून तामिळनाडूतील तीचे गांव गाठून तिला ताब्यात घेतले. त्यांनतर तपास केला असता तीने ९ घरात अशा प्रकारे चोरी करताना ६० लाख १० हजार १०० रूपयाचा ऐवज चोरी केल्याचे सांगितले. त्यांनतर पोलिसांनी तिला रविवार (ता.१२ )पर्यंत पोलिस कस्टडीत घेवून तपास चालविला आहे. त्यानुसार निपाणीतील तीन ते चार दुकानात तीने चोरीचे दागीने विकल्याचे सांगितले. त्यानुसार पुणे येथील पोलिस इनोव्हा व अन्य वाहनांतून येवून निपाणी शहर पोलिस ठाण्यातील दोन सहकाऱ्यांना घेवून सोन्याच्या दुकानात तपास केला.

येथील एका दुकानात सोन्याच्या पाटल्या, चेन, हिरयांच्या अंगठ्या असे ३० लाखाचे दागिने विकल्याचे सांगितले. यावेळी दुकानारांची तर पाचावर धारण झाल्याचे दिसून आले. दुकानदाराने आपल्या दुकानातच इतक्या वस्तू नाहीत तर इतके विकत कसे घेवू असा प्रश्न केला. पण ती महिला स्वतः सांगत असल्याने पोलिसांनी संबधिताना त्याबाबत नोटीस दिली आहे. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

loading image
go to top