Mother Son Death Tragedy : काळीज पिळवटणारी घटना! आईच्या निधनाचा धक्का असह्य, काही तासांतच मुलानेही सोडले प्राण; एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी गाव सुन्न

Emotional Mother-Son Incident Shocks Nipani : यमगर्णी येथे आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुंबईत राहणाऱ्या मुलाचाही काही तासांत मृत्यू झाला. माय-लेकाच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
son dies after mother death in nipani

son dies after mother death in nipani

esakal

Updated on

निपाणी : आई व मुलाचे नाते हे जगातील सर्वात पवित्र आणि घट्ट मानले जाते. या नात्याची प्रचिती देणारी; परंतु तितकीच काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना यमगर्णी येथे (son dies after mother death in nipani) घडली. जन्मदात्या आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासांतच मुलानेही जगाचा निरोप घेतला. आऊबाई अर्जुन सुतार (वय ८५) व विजय अर्जुन सुतार (५२) असे माय-लेकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com