#SSCL निर्मला कॉन्व्हेंट, शानभाग विद्यालय विजयी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेत शानभाग विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे यांच्यातील लढत करो या मरो अशा स्थितीत येऊन पोचलेली आहे. या लढतीस  आज (शनिवार) सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार असून, या दोन्ही संघांना स्पर्धेत टिकण्यासाठी या सामान्यात विजय मिळविणे आवश्‍यक आहे. 

सातारा ः जैद शेख, अर्जुन वाघ, अनिश शिरसाट यांच्या धुवाधार फलंदाजीने, तसेच जैद शेख व वेदांत देवडे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे निर्मल कॉन्व्हेंट स्कूल संघाने न्यू इंग्लिश स्कूल संघाचा पराभव करून सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला. अन्य एका सामन्यात केएसडी शानभाग विद्यालयाने अनंत इंग्लिश स्कूल संघाचा पराभव केला.
 
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा घेण्यात येत आहे. 
निर्मला कॉन्व्हेंट आणि न्यू इंग्लिश स्कूल या संघातील सामन्याची नाणेफेक मेगा इंजिनिअरिंगचे विशाल ढाणे यांच्या हस्ते करण्यात आली. "निर्मला'ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जैद शेख, अर्जुन वाघ, अनिश शिरसाट यांच्या धुवाधार फलंदाजीने निर्मला संघास भक्कम धावसंख्या उभारता आली. दुसऱ्या बाजूने प्रथमेश जाधवने उत्कृष्ट गोलंदाजी करत "निर्मला'च्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. "निर्मला'च्या 20 षटकांत 6 बाद 160 धावा झाल्या.

Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ

प्रत्युतरात न्यू इंग्लिश संघाचे पहिले तीन फलंदाज संघाच्या 23 धावांतच बाद झाले. त्यानंतर आलेल्या हर्षवर्धन अष्टेकरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली; परंतु दुसऱ्या बाजूने त्याच्या संघातील एकेक गडी बाद झाल्याने संघास 58 धावांनी पराभूत व्हावे लागले. तालुका क्रीडाधिकारी बळवंत बाबर यांच्या हस्ते "निर्मला'च्या जैद शेख यास सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 
अनंत व शानभाग यांच्यातील सामन्याची नाणेफेक प्लॅनेट फर्निचरचे संचालक कुलदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. "अनंत'ने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; परंतु "शानभाग'च्या गोलंदाजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. "अनंत'चा डाव 12.1 षटकांत 40 धावांत आटोपला. शानभाग विद्यालयाने 41 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते शानभाग विद्यालयाच्या ओम केसरकरला सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक 

निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल 20 षटकांत 6 बाद 160. जैद शेख 36 (39 चेंडूंत चार चौकार), अर्जुन वाघ 30 (11 चेंडूंत चार चौकार), अनिश शिरसाट 58 (31 चेंडूंत पाच चौकार), पार्थ जाधव नाबाद 11, स्नेहित केकडे नाबाद 9. प्रथमेश जाधव 4-31-4, समर्थ चोपडे 1, नेत्रदीप वैद्य 1. वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल 20 षटकांत 8 बाद 102, समर्थ चोपडे 10 (13 चेंडूंत एक चौकार), हर्षवर्धन अष्टेकर नाबाद 51 (57 चेंडूत 10 चौकार). रविराज काशिद नाबाद 2. जैद शेख 4-5-3, वेदांत देवडे 4-22-2, पार्थ जाधव 1, आदित्य नलवडे 1, अनिश सिरसाट 1. 

 गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची चमकदार कामगिरी

#SSCL निर्मलाची शानभाग वर मात; पोदारचा धावांचा पाऊस

#SSCL न्यू इंग्लिश स्कूल,गुरुकुल स्कूल विजयी

संक्षिप्त धावफलक 

अनंत इंग्लिश स्कूल 12.1 षटकांत सर्वबाद 40. सुयोग इंदलकर 9, रविकिरण तांदळे 5, साईदत्त साबळे 3- 1-12-3, ओम केसरकर 3.1-19-4. अथर्व कुलकर्णी 1, सुयोग जाधव 1. पराभूत विरुद्ध केएसडी शानभाग विद्यालय 6.3 षटकांत 3 बाद 41 ः आकाश पांडेकर नाबाद 31(19 चेंडूंत 6 चौकार), हर्ष सोनावले नाबाद 1. 

"शानभाग' व "न्यू इंग्लिश'ची लढत करो या मरो 

स्पर्धेतील ब गटातील अनंत इंग्लिश स्कूलने दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे. याच गटातील शानभाग विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. त्यामुळे यांच्यातील लढत करो या मरो अशा स्थितीत येऊन पोचलेली आहे. ही लढत उद्या (शनिवार) होणार असून, या दोन्ही संघांना स्पर्धेत टिकण्यासाठी या सामान्यात विजय मिळविणे आवश्‍यक आहे. तसेच दुपारी साडेबारा वाजता इक्रा इंग्लिश मिडियम स्कूल आणि महाराजा सयाजीराव विद्यालय यांच्यात सामना हाेईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmala Convent School And Shanbhag Vidyalay Won In Sakal School Cricket League