esakal | बहिरेश्वर सरपंचांवर अविश्‍वास ठराव मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

No-confidence motion passed on Bahireshwar Sarpanch

विशेष सभेत एकविरुद्ध दहा मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर केला. लोकनियुक्त सरपंचांवर ठराव मंजूर होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

बहिरेश्वर सरपंचांवर अविश्‍वास ठराव मंजूर

sakal_logo
By
नामदेव माने

कसबा बीड : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच साऊबाई नारायण बचाटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत एकविरुद्ध दहा मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर केला. लोकनियुक्त सरपंचांवर ठराव मंजूर होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचा- जागेवरच पाणी बील भरण्याच्या योजनेचा कोल्हापुरातील 28036 कनेक्‍शनधारकांनी घेतला लाभ

उपसरपंचासह सदस्य युवराज दिंडे, तानाजी गोधडे, उत्तम चव्हाण, कृष्णात सुतार, रंजना संभाजी दिंडे, रंजना रामचंद्र दिंडे, मीनाक्षी गोसावी, योग्यता गोसावी व शालाबाई कांबळे यांनी सरपंच सौ. बचाटे या सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी कारभार करतात हे कारण दाखवत नवीन शासन निर्णयाच्या आधारावर करवीर तहसीलदार कार्यालयात तक्रार करत अविश्‍वास ठराव दाखल केला होता. यावर निर्णयासाठी सदस्यांची बैठक आज तहसीलदार मुळे-भामरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

हेही वाचा- कोरोनाला रोखण्यासाठी आता पोलिसांची गांधीगिरी

सरपंच शालाबाई बचाटे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर केला. यावेळी तलाठी पुरुषोत्तम ठाकूर उपस्थित होते. नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्रामसेविका विमल पवार, प्रोबेशनल तलाठी स्वाती भोईर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जुलै 2018 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे सीताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतून लोकनियुक्त सरपंच बचाटे यांच्यासह आघाडीची सत्ता आली होती. सरपंचाचे नातेवाईकच कारभारात हस्तक्षेप करतात, असा आरोप बैठकीत केला. सर्व सदस्यांनी हात उंचावर करून अविश्वासच्या बाजूने मतदान केले.

हे पण वाचामजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ

कायद्यातील बदलानुसार बैठक
2017 च्या लोकनियुक्त सरपंच कायद्यानुसार सरपंचांवर अविश्वास दाखल करताना पहिल्यांदा सर्व सदस्यांनी अविश्वास दाखवून ग्रामसभेत बहुमत सिद्ध करावे लागत होते; पण लोकनियुक्त सरपंच कायदा बदलल्यानंतर पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना अविश्वास ठरावावर सदस्यांना तहसीलदारांच्या उपस्थितीत मतदान करता येते. त्यानुसार आज अविश्वास ठरावासाठी बैठक झाली. लोकनियुक्त सरपंचाला पायउतार होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

संपादन- रंगराव हिर्डेकर