"या' दिवसापासून नंदीध्वज मिरवणूक मार्गावर "नो पार्किंग झोन'

No Parking
No Parking
Updated on

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वज मिरवणूक मार्ग आणि श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसर, बाजार परिसर आणि होम मैदान या ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी याबाबत पत्र काढले असून 13 ते 17 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विविध राज्यांतून येतील तीन ते चार भाविक
यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्‍वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, होम मैदान या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडतात. श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरातही भाविकांची मोठी गर्दी असते. महापालिकेने या परिसरात जनावरांच्या बाजाराला परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, या हेतूने वाहने रोडवर पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येतील, असा अंदाज पोलिस आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे. होम मैदानावर स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचेही आयुक्‍त श्री. शिंदे यांनी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नंदीध्वज मिरवणूक मार्ग
हिरेहब्बू मठातून मिरवणुकीस सुरवात होणार असून, तेथून बाबा कादरी मशीद, डॉ. चिडगुपकर यांचे घर, श्री केळकर वकील यांचे घर, दाते यांचे श्री गणपती मंदिर, हाजीमाई चौक, खाटीक मशीद, कसबा चौक, माणिक चौक, विजापूर वेस, वडतिले यांचे दुकान, घिसाड गल्ली, पंचकट्टा, रिपन हॉलवरून श्री सिद्धेश्‍वर मंदिर (संमती कट्टा) असा नंदीध्वज मिरवणुकीचा मार्ग आहे.

वाहतुकीत असा असणार बदल
बंद मार्ग व पर्यायी मार्ग
विजापूर वेस ते पंचकट्टा - विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकी मार्गे
लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा - विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकी मार्गे
भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा पूनम चौक ते बेगमपेठ पोलिस चौकी मार्गे
भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक पूनम चौक - रंगभवन चौक-सात रस्ता-जुना एम्प्लॉयमेंट चौक-डफरीन चौक-पार्क चौक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Fugitive Interception Slabs: LCB Executes Intelligence Raid Inside Karnataka Border Limits
Marathi News Esakal
www.esakal.com