ST Worker Strike : एसटीच्या गाड्यांना संपाचा ब्रेक, चाक जागेवरच थांबले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Worker Strike

एसटीच्या गाड्यांना संपाचा ब्रेक, चाक जागेवरच थांबले

सांगली : एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये एसटी कर्मचारी कृती समिती देखील सहभागी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आगारातील एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. एसटीचे चाक पूर्णपणे थांबले असून प्रवाशांना ऐन सणासुदीत वडापला जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा: ST STRIKE: विलिनीकरणासाठी लवकरच GR निघणार

दूरवरच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विविध आगारात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सांगलीतही संपामुळे इस्लामपूर, एसटी कर्मचारी कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी २७ ऑक्टोंबरपासून बेमुदत उपोषण जाहीर केले होते. त्यानुसार राज्यभर आंदोलन सुरू झाले होते. परंतू २८ ऑक्टोंबरला परिवहन मंत्री अनिल परब यांनी महागाई भत्ता व घरभाडे भत्ता याबाबत निर्णय जाहीर केला. तसेच वेतनवाढीबाबत दिवाळीनंतर बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतू त्याचवेळी राज्यातील काही आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपाची हाक दिली. भाजपनेया आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आटपाडी आगारापासून त्याची सुरवात झाली.

काल आटपाडी, इस्लामपूर, शिराळा, जत या चार आगारातील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. आता कृती समिती देखील संपात सहभागी झाली आहे. त्यामुळे आज सकाळपासून एसटीच्या सर्व आगारातील गाड्या जागेवरच थांबल्या होत्या. अपवाद फक्त खासगी तत्वावर चालणाऱ्या शिवशाही गाड्यांचा होता. परंतू त्याच्याही फेऱ्या कमी आहेत. एसटीचे चाक जागेवर थांबल्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वडापचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच शहरात रिक्षांची चलती आहे.

हेही वाचा: 'आमदार पडळकरांना संरक्षण द्या; भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाही!'

परंतू अनेकांनी एसटीच्या संपाचा फायदा घेत जादा भाडे आकारून लूट चालू केली आहे. जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र इतर पर्याय नाही. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची मर्यादा असल्यामुळे अनेकजण मिळेल त्यागाडीने प्रवास करत आहेत. दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकासमोर संपातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मागण्या मान्य झाल्याशिवायआंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आंदोलनात महिला कर्मचारीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SangliSTMSRTC
loading image
go to top