
सांगली जिल्ह्यातील जत येथे पोलिस पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना
esakal
Sangli Jat Crime News : जत शहरात मध्यवर्ती पारधी तांडा येथील एका गुन्ह्यातील संशयित आरोपी धनंजय दीपक चव्हाण याला ताब्यात घेताना पोलिसांना धक्काबुक्की करत पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिसांत पोलिस हेडकॉन्स्टेबल अच्युतराव विनायक माने यांनी फिर्याद दिली आहे.