धक्कादायक ! बलुन गॅस सिलिंडरच्या स्फोटात मुलगी ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

स्वामी मळा परिसरात मुकेश राठोड फुगेवाला कार्बन पावडरपासून स्वतः गॅस तयार करत होता. त्याने काल रात्री गॅस टाकी भरून ठेवला होता. आज सकाळच्या सुमारास या टाकीचा स्फोट झाला. यामध्ये दारात खेळत असणारी सना ही मुलगी जखमी झाली.

इचलकरंजी - कोल्हापूर नाका परिसरातील स्वामी मळा येथे बलुनमध्ये गॅस भरण्याच्या सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात बारा वर्षांची एक मुलगी ठार झाली आहे. सना पठान (१२) असे या मुलीचे नाव आहे. गॅस स्फोटाची  शहरातील ही चौथी घटना असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

काय सांगता ! कापड विक्रेत्याकडे सापडल्या 97 हजारांच्या बनावट नोटा 

स्वामी मळा परिसरात मुकेश राठोड फुगेवाला कार्बन पावडरपासून स्वतः गॅस तयार करत होता. त्याने काल रात्री गॅस टाकी भरून ठेवला होता. आज सकाळच्या सुमारास या टाकीचा स्फोट झाला. यामध्ये दारात खेळत असणारी सना ही मुलगी जखमी झाली. तिचे दोन्ही हात व पाय निकामी झाले. गंभीर अवस्थेत तिला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

स्वाभिमानी संघटनेने साखर कारखानदारांना दिला हा इशारा 

आई आणि भाऊ सुदैवाने बचावले

सनाची आई रेश्मा पठाण आणि लहान भाऊ उमर हे दारात होते. आई रेश्मा भांडी घासत होती. पण सुदैवाने या घटनेत त्यांना काहीही इजा झाली नाही. स्वामी मळा परिसरात पठाण कुटुंबीय गेल्या आठ वर्षापासून राहत आहेत. मृत मुलीचे वडील सेंट्रींग काम करून आपला उदरनिर्वाह करतात. या स्फोटाच्या दुर्घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार व पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

अखिल भारतीय कुलगुरू चषक सोमवारपासून कोल्हापुरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Dead In Balloon Gas Cylinder Blast In Ichalkaraji