गडाखांचं हे असं असतं... मुळाथडीवरील एक लाख कुटुंबांना किराणा... सव्वाकोटीचा खर्च

One lakh families in Nevasha will get groceries
One lakh families in Nevasha will get groceries

सोनई: नेवाशातील गडाख कुटुंबाने राजकारण, समाजकारण, साहित्य, शिक्षण अशा बहुतांश सर्वच क्षेत्रात मैलाचा दगड रोवला आहे. कोरोनाचे संकट आल्यावर सर्वप्रथम जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी आपली पोलिस यंत्रणा नाकारली. त्यानंतर बंधू प्रशांत पाटील गडाख, वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्वतः आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. आता त्यांनी लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे.

मंत्री गडाख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व मुळा ग्राहक भांडार यांच्यातर्फे नेवासे तालुक्‍यातील एक लाख गरजू कुटुंबांना आजपासून (सोमवारी) किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहेत. गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. 

देशात "लॉक डाऊन' असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची चूल पेटणे अवघड झाले आहे. मजूर, हमाल, दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी मंत्री गडाख यांची भेट घेऊन अडचणींचा पाढा वाचला. गडाख यांनीही अनेक वस्त्यांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व मुळा ग्राहक भांडार यांच्याकडे मदतीबाबत संकल्पना मांडली. 

शनैश्वर देवस्थान व मुळा भांडाराच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत गरजू कुटुंबांना साखर, तांदूळ व तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. या सर्व जीवनावश्‍यक वस्तूंच्या एक लाख पिशव्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांचे वाटप उद्यापासून (ता. सहा) सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सात गटांतील सर्व गावे व नेवासे शहरात त्यांचे वितरण होणार आहे. 

किराणा साहित्य जमा झाल्यावर त्याच्या पॅकिंगचा प्रश्न निर्माण झाला. सोनईतील व्यापारी असोसिएशन, जैन युवा मंच, माहेश्वरी युवा मंडळ, "मुळा बाजार' कर्मचारी व तरुण मंडळातील युवकांनी सर्व वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी हातभार लावला. 

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासन स्तरावर मोठे काम सुरू आहे. पोलिस, आरोग्य विभाग दिवस-रात्र झटत आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही बाब लक्षात घेऊन गरजूंना मदत करणे गरजेचे होते. पद, प्रसिद्धी, "मी'पणा व राजकीय जोडे बाजूला ठेवून हे काम करणे गरजेचे आहे. 
- शंकरराव गडाख, जलसंधारणमंत्री 

वाटप होणाऱ्या वस्तू 
साखर-10 टन 
तांदूळ- 10 टन 
तूरडाळ- 10 टन 

कुटुंबसंख्या : 1 लाख 
लाभार्थी गावे : 129 
अंदाजे खर्च : 1 कोटी 25 लाख 
वितरण करणार : 540 
पॅकिंग करणारे : 320 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com