यमगर्णी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु

यमगर्णी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
Summary

सायंकाळनंतर पूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असे मंडल पोलिस निरीक्षक शिवयोगी संगमेश यांनी सांगितले.

निपाणी (बेळगाव): यमगर्णी वेदगंगा नदी परिसरातील पूर झपाट्याने ओसरू लागला आहे. परिणामी तब्बल चार दिवसांनंतर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरल्याने सोमवारी (ता‌. २६) पहाटे महामार्ग खुला झाला. त्यानंतर ११.३० च्या सुमारास कोगनोळी-बेळगाव अशा एकेरी मार्गावर वाहतूक सुरु झाली. मात्र बेळगाव, निपाणी, कोगनोळी मार्गे अद्याप महाराष्ट्रात सेवा सुरु झालेली नाही. सायंकाळनंतर पूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असे मंडल पोलिस निरीक्षक शिवयोगी संगमेश यांनी सांगितले.

यमगर्णी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद

अतिवृष्टीमुळे गुरुवारी (ता.२२) रात्री उशीरा यमगर्णी वेदगंगा नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्ग पाण्यात बुडाला होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने महामार्गावरील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत जाऊन ती आठ फूटांपर्यंत पोचली होती. त्यामुळे वाहतूक बंद करून येथे कडक बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीसाठी महामार्ग बंद झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यमगर्णी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
निपाणी, चिक्कोडी'तील 7 बंधारे पाण्याखाली!

सोमवारी (ता. २६) महामार्ग खुला झाला तरी सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक सुरु केलेली नव्हती. नजिकच्या महाराष्ट्रातील कागल, शिरोली येथील महामार्गावर अद्याप काही प्रमाणात पाणी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे कोगनोळी-बेळगाव एकेरी वाहतूक सुरु झाली.

जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी महामार्गावर भेट देऊन पाहणी केली. स्थानिक प्रशासन व जिल्हाधिकारी महाराष्ट्र प्रसासनाच्या संपर्कात आहेत. वरीष्ठ प्रशासनाने अद्याप एकेरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यास मुभा दिली आहे.

सायंकाळपर्यंत पूर्ण वाहतूक सुरु होईल, असे मंडल पोलिस निरीक्षक शिवयोगी संगमेश यांनी सांगितले. सध्या महामार्गावर वाहनांची रांग असल्याने वाहतूक सुरु झाल्यावर ती सुरळीत करण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

यमगर्णी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
निपाणी-गडहिंग्लज मार्गावर सुमारे 4 लाखाचा दारुसाठा जप्त; अबकारी पथकाची कारवाई

कार काढण्यासाठी प्रयत्न

महामार्गावर पुरात ट्रक व कार ही वाहने शुक्रवारी अडकली होती. त्यापैकी कार पुरात वाहून गेली होती. सोमवारी सकाळी पाणी ओसरल्याने कार काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

नजीकच्या महाराष्ट्रातील हद्दीत अद्याप काही ठिकाणी पाणी असल्याचे समजते. कोगनोळी-बेळगाव एकेरी महामार्गावर वाहतूक सुरु आहे. सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत होईल वाटते.

-शिवयोगी संगमेश, मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com