अंधाना मिळणार वैज्ञानिक दृष्टी 

Organizing the program Smiling playing science
Organizing the program Smiling playing science
Updated on: 

सांगली - अंध मुलांना वैज्ञानिक दृष्टी देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी "हसत खेळत विज्ञान' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

एरवी अंध मुलांना शाळेत फक्त विज्ञानाची थेअरी शिकवली जाते. पण त्यांच्याकडून विज्ञान प्रयोग करून घेतले जात नाहीत. त्यामुळे ही मुले विज्ञान प्रयोगापासून वंचितच राहतात. या मुलांना वैज्ञानिक प्रयोग शिकविण्याचे समितीने ठरवले आहे. फक्त आवाज आणि स्पर्श याचा वापर करून विज्ञान समजून सांगणारे काही विज्ञान प्रयोग निश्‍चित केले आहेत. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांनी अशा प्रयोगांची यादी तयार केली आहे. त्याची काही प्रात्यक्षिके कोल्हापूर येथील अंध शिक्षक प्रमोद नवले यांनी सादर केली. अंनिस कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, आशा धनाले यांची भेट घेऊन या प्रयोगांची माहिती जाणून घेतली. 

येत्या विज्ञान दिनी 28 फेब्रुवारीला कोल्हापूर येथील अंध शाळेतील मुलांना हे प्रयोग शिकवले जाणार आहेत. यावेळी प्रा. अमित ठकार, आर. एस. कुलकर्णी, डॉ. सविता अक्कोळे, संजय गलगले, त्रिशला शहा, चंद्रकांत वंजाळे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com