उस्मानाबाद : जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चितीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

उस्मानाबाद : जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चितीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना नव्याने तयार करण्याच्या सुचना निवडणुक विभागाने दिल्या आहेत.दर दहा वर्षानी ही प्रभाग रचना होत असते, पण यावेळी पाच वर्षानंतरच प्रभागरचनेत बदल होत आहे.जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चितीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घ्यावा लागणार आहे.

23 सप्टेंबर 2021 द्वारे जिल्हा परिषद व पंचायत समित्यामधील नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखुन ठेवायच्या जागा आरक्षण तसेच एकुण आरक्षण पन्नास टक्केबाबत सुधारणा केलेली आहे. त्यास उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान देण्यात आलेले आहे. या याचिकेत 22 ऑक्टोबर 21 च्या अंतरिम आदेशाद्वारे याचिका प्रलंबित असताना आयोगाच्यावतीने करण्यात आलेली कोणतीही कार्यवाही या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहणार असल्याचे यामध्ये स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेची तयारी सूरु करणे आवश्यक असल्याने या सुचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: "मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही..."; मलिकांचा फडणवीसांना टोला

आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता आणि निवडणुका मुदत समाप्तीपुर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी ही कार्यवाही तातडीने करुन घेण्याबाबत सुचित केले आहे.30 नोव्हेंबर पर्यंत ही कार्यवाही पुर्ण करण्याचे आदेशात म्हटले आहे.यामध्ये लोकसंख्या,कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती गठित करणे,प्रगणक गटाची मांडणी तंतोतत करावी,प्रभांगाची संख्या ठरविणे,प्रभागाची सरासरी लोकसंख्या,प्रभागरचनेची दिशा याबाबत सुचना दिल्या आहेत.उत्तर दिशेकडुन सूरुवात उत्तरेकडुन ईशान्य त्यानंतर पुर्व दिशेकडे येऊन पुर्वेकडुन पश्चिमेकडे रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा अशा प्रकाची रचना करण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणे : वॉर्ड रचना पुन्हा बदलणार?

आता आहे त्या गट व गणात बदल होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.साहजिकच तेथील आरक्षणही बदलले जाणार असल्याने अगोदरच तयारी करुन बसलेल्या अनेक पुढाऱ्यांची यामुळे चांगलीच अडचण झाल्याचे चित्र आहे. येणारा गट कसा असणार त्यावर आरक्षण काय पडणार यावरच बऱ्याच जणांचे राजकीय भविष्य अवलंवुन असणार आहे.गेल्याचवेळी गटामध्ये बदल झालेले होते,त्यामुळे त्यात आता नव्याने बदल झाल्याने गेल्यावेळी ज्यांचे स्वप्न भंग झाले होते,त्यांना आता संधी मिळण्याची शक्यता वाटत होती.पण पुन्हा अपेक्षित बदल झाला नाहीतर अशा लोकांना पुन्हा पाच वर्षाची विश्रांती घ्यावी लागण्याचीही भिती आहे.तर काहीजणांना सलग दोन वर्ष लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

loading image
go to top