Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi
Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi

अन्यथा मला टाेल वसूली थांबवावी लागेल - उदयनराजे भाेसले

सातारा : सातारा - पुणे या राष्ट्रीय महार्मावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
या रस्त्यावरुन प्रवास करणा-यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शाररिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमधुन होत असलेला उठाव योग्य असल्याने  रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्यांची जरुर ती सर्व दुरुस्ती-डागडुजी करावी अन्यथा एक डिसेंबर 2019 पासून सातारा पुणे रस्त्यावरील दोन्ही टोल नाक्‍यांवरील टोल वसुली थांबवू असा इशारा माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकारीण व रिलायन्सला दिला आहे.



राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सातारा - पुणे रस्त्यावर जवळजवळ सर्वच ठिकाणी एखाद्या अप्रगत भागातील कच्या रस्त्यासारखी अवस्था झाली आहे. हा महामार्ग राहिला आहे का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे हा रस्ता व्यवस्थि रित्या हाेईपर्यंत टोल आकारला जाऊ नये अशी भुमिका टाेल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने घेतली आहे. रस्ते दुरुस्त करा सर्व सुविधा दया, तोपर्यंत सातारा - पुणे रस्त्यावरील दोन्ही ठिकाणचे टोल वसुल करु नये अशा आशयाचा संघर्ष उभारला आहे. या समुह संघटनेच्या वतीने माजी खासदार उदयनराजे भोसले यांना पुणे येथे निवेदन देण्यात आले. 

उदयनराजेंनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधीत अधिकारी आणि रिलायन्सचे अधिकारी यांना बोलावून टोलविरोधी जनता या संघटनेचे प्रतिनिधी यांचे समोरच या प्रकरणी विस्तृत चर्चा केली असे जलमिंदर पॅलेस येथून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. .
 
यामध्ये चर्चेदरम्यान सातारा - पुणे हा राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी उखडला गेला आहे. काही ठिकाणी उड्‌डाणपूलाची कामे अजुनही चालु असल्याने, पर्यायी उपलब्ध केलेला वळण रस्ता हा प्रचंड खराब आहे. महामार्गावर काही ठिकाणी विचित्र प्रकारचे उंचवटे आणि खोलगट स्लोप असल्याने, वाहनधारकांना ते समजत नाही आणि त्यामुळे मोठे अपघात घडत आहेत.

याबाबत टोल विरोधी सातारी जनता यांनी सुरु केलेले आंदोलन आणि जनजागृती समर्थनीय आहे. आम्ही स्वतः वेळोवेळी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन, विनंत्या करुन, रस्त्याच्या सुव्यवस्थेबाबत कायमच भुमिका मांडलेली आहे. त्यामुळे या महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडूजी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत करावी. अन्यथा एक डिसेंबरपासून जनतेला बरोबर घेवून, सातारा पुणे रस्त्यावरील दोन्ही टोल नाक्‍यावरील टोल वसुली करु दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला.

या बैठकीच्या वेळी सातारा कोल्हापूर रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने टोल वसुली केली जात आहे, त्या तासवडे आणि किणी या दोन्ही टोलनाक्‍यांवर चोवीस तासात परत येणा-या प्रवाशांसाठी रिटर्न टोल पाउण किंमतीत मिळावी यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी सूचना रस्ते विकास महामंडळाला उदयनराजेंनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com