Video : सूर पाट्या, भोवरा, लंगडी, विटी-दांडू...मातीच्या खेळात रमले बारामतीकर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून बारामतीत मातीतल्या खेळांच्या जत्रेचे आयोजन केले जात आहे. सूर पाट्या, भोवरा, लंगडी, दोरीवरच्या उड्या, विटी-दांडू, तळ्यात-मळ्यात, टायर पळवणे, गोट्या अशा अनेक पारंपरिक खेळांचा आनंद आज छोट्या दोस्तां सोबत मोठ्यांनीही मनसोक्तपणे लुटला.

बारामती : आपले मोठेपण विसरून आज अनेक बारामतीकरांनी आपल्या बालपणाचा आनंद लुटला. छोट्या बाल गोपालासोबतच लहान होत आज एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने आयोजित मातीतील खेळांच्या जत्रेमध्ये बारामतीकर उत्साहाने सहभागी झाले.

सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून बारामतीत मातीतल्या खेळांच्या जत्रेचे आयोजन केले जात आहे. सूर पाट्या, भोवरा, लंगडी, दोरीवरच्या उड्या, विटी-दांडू, तळ्यात-मळ्यात, टायर पळवणे, गोट्या अशा अनेक पारंपरिक खेळांचा आनंद आज छोट्या दोस्तां सोबत मोठ्यांनीही मनसोक्तपणे लुटला.

कुठे आग लागो, की घरे-झोपड्यांत पुराचे पाणी शिरो... आम्ही बाह्या सरसावून पुढे 

मोबाईल बाजूला ठेवून आज अनेक जण या मातीतल्या खेळांच्या जत्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच शारदा प्रांगणात बारामतीकरांनी या खेळाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील आपले पद आणि हुद्दा विसरून या मातीत या खेळांच्या जत्रेत सहभागी झाले होते. एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सर्वांचे या प्रसंगी स्वागत केले.

पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outdoor Games enjoyed by baramati people