कुपवाडला उर्दू शाळेत झाडाझडती! शिक्षण विभागानं मुख्याध्यापकांना धरलं धारेवर; असं नेमकं काय घडलं?

जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मैनुद्दीन अख्तर यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने धारेवर धरले.
Urdu school in Kupwad
Urdu school in Kupwadesakal
Summary

त्यांनी तत्काळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमीरहमजा यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली आणि घडलेला प्रकार सांगितला.

कुपवाड : शाळेत वेळेवर उपस्थित न राहणे, शाळा सुटल्यानंतर वर्गाला कुलूप न लावता निघून जाणे, शिक्षक व विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करणे, इमारतीत स्वच्छता न राखणे, दैनंदिन अहवाल न ठेवणे असे बेजबाबदार वर्तन करणाऱ्या येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मैनुद्दीन अख्तर यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने धारेवर धरले.

बेजबाबदारपणाविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सुनील गच्छे, शिक्षण विस्ताराधिकारी सिद्धराया चिखलकी, शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमीरहमजा मुजावर, केंद्रप्रमुख शशिकांत माने, सामाजिक कार्यकर्ते रफिक मुजावर, मनोज आदाटे उपस्थित होते.

Urdu school in Kupwad
देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली. विद्यार्थी व शिक्षक गेले. गडबडीत वर्ग कुलूप लावून बंद करताना अख्तर यांनी एका वर्ग खुलाच ठेवला. त्यात डिजिटल स्क्रीन, बेंच व महत्त्वाचे शैक्षणिक साहित्य होते. सहा-साडेसहाच्या सुमारास मनोज आदाटे यांना याबाबत समजले. त्यांनी दखल घेत सतर्कतेपोटी घटनेची माहिती रफिक मुजावर यांना दिली. त्यांनी तत्काळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमीरहमजा यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली.

साहित्याची चोरी होऊ नये, याची दक्षता घेऊन मुजावर यांनी रात्रभर राखण केली. सकाळी मुख्याध्यापक अख्तर यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुजावर व नागरिक तेथेच थांबले. विद्यार्थी व अन्य शिक्षक शाळेत आले. अकरा वाजता आले तरी मुख्याध्यापक शाळेत नव्हते. मुजावर यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com