पासपोर्ट कार्यालय सोमवारपासून होणार सुरू

पासपोर्ट कार्यालय सोमवारपासून होणार सुरू

बेळगाव: राज्यात लॉकडाऊन लागु करण्यात आल्यामुळे बेळगाव (belgaum) शहरातील पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) (passport office) गेल्या पावने दोन महिन्यांपासून बंदच आहे. मात्र, राज्य अनलॉक झाल्यामुळे हे केंद्र सोमवारपासून (ता.२८) पुन्हा सुरु केले जाणार आहे. तब्बल दोन महिन्यानंतर कार्यालय सुरु होणार आहे. बेळगाव मुख्य पोस्ट ऑफीस कार्यालयाच्या मागील बाजूला पासपोर्ट केंद्र आहे. १४ फेब्रुवारी २०१८ साली या केंद्राचे उदघाटन करण्यात आले होते.(passport-office-open-from-monday-belgaum-marathi-news)

गेल्या तीन वर्षात या ठिकाणी २५ हजार हून अधिक जणांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना देखील या ठिकाणी पासपोर्ट काढता येणार असल्याने महाराष्ट्रातील नागरिक देखील पासपोर्ट काढून घेत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन झाले होते. त्यानंतर सुमारे सहा महिने हे केंद्र बंदच होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या सुचनेनंतर कार्यालय पुन्हा सुरु करण्यात आले. सुमारे सहा महिने कोणत्याही अडथळ्याशिवाय कार्यालय सुरु होते. मात्र, राज्यात २७ एप्रिलपासून विकेंड लॉकडाऊन व कोरोना कर्फ्यू लागु करण्यात आल्यामुळे कार्यालय बंदच होते. मात्र, २८ जुनपासून पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरु केले जात असल्याने बेळगावकरांना पुन्हा पासपोर्ट काढता येणार आहे.

राज्यात अजूनही विकेंड लॉकडाऊन असल्याने आठवड्यातील फक्त पाच दिवस हे कार्यालय सुरु असणार आहे. तसेच सुरुवातीला रोज ४० जणांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. ज्यांना पासपोर्ट हवा आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोनामुळे गेल्या पावने दोन महिन्यांपासून पासपोर्ट कार्यालय बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनध्ये शिथिलता आल्यामुळे २८ जूनपासून पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरु केले जाईल. नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करावा.

-एच. बी. हसबी, पोस्ट अधिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com