Ped Water Shortage : पाण्याअभावी द्राक्षबाग फळछाटणी रखडली टंचाईच्या झळा ; पेड परिसरातील स्थिती; उत्पादक शेतकरी चिंतेत

Grape Growers Face Water Crisis After Poor Rainfall : तासगाव तालुक्यातील पेड परिसरात पाण्याअभावी द्राक्षबागांची फळछाटणी संथ झाली आहे. पाऊस कमी झाल्याने तलाव, ओढे, नाले कोरडे पडले असून विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे.
Ped Water Shortage

Ped Water Shortage

esakal

Updated on: 

पेड : तासगाव तालुक्यातील पेड परिसरात द्राक्षबागांची फळछाटणी यंदा अतिशय संथ गतीने सुरू आहे. पावसाने दडी मारल्याने पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे फळछाटणीनंतर बागांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

पेडसह मांजर्डे, हातनूर, मोराळे आदी गावांत मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या काड्या परिपक्व करून फळछाटणीसाठी बागा तयार ठेवल्या आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार अनेक शेतकरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी करतात, तर बेदाण्यासाठी द्राक्ष घेणारे शेतकरी साधारण ऑक्टोबरमध्ये छाटणी करतात.

Ped Water Shortage
Dabhatt E-Pik Pahani : दाभट गावातील ई-पीकपाहणी शंभर टक्के पूर्ण मंडणगड तालुक्यातील पहिले गाव; प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यात यश

मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने तलाव, ओढे आणि नाले कोरडे पडले आहेत. विहिरींनीही तळ गाठला असून, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे द्राक्षबागांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने फळछाटणी पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Ped Water Shortage
Ram Temple Staff Verification : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तपासणार अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा मोठा निर्णय

द्राक्षपिकातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र सप्टेंबर संपून ऑक्टोबर सुरू झाला तरी परिसरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच फळछाटणी झाली आहे. फळछाटणीनंतर बागांना नियमित पाणी द्यावे लागते. अनेक शेतकऱ्यांकडे पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने त्यांनी छाटणी थांबवून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू केली आहे.

पावसाळा संपत आला तरी परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आव्हान द्राक्ष उत्पादकांसमोर आहे. पाण्याअभावी फळछाटणी संथ गतीने होत असल्याने यंदाच्या द्राक्ष हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com