Coronavirus : सातारा जिल्ह्यातील सर्व पेट्राल पंप 'या' दिवशी बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व यात्रा, उत्सव व तत्सम कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.

सातारा : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या जनता करफ्यू याच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून व काेराेना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व पेट्राेल पंप रविवारी (ता. 22) सकाळी सहा ते साेमवारी (ता. 23) सकाळी सहा पर्यंत बंद राहतील अशी माहिती सातारा जिल्हा पेट्राेलियम डीलर्सचे अध्यक्ष माेहन बढिये, सचिव नितीन कदम यांनी दिली. 

दरम्यान कोरोनाचा मुकाबला सर्व जिल्हावासीयांनी एकत्रित करावयाचा आहे. त्यासाठी प्रशासन घालत असलेल्या निर्बंधांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कोरोना संशयित रुग्णाबाबत काहीही माहिती मिळाल्यास स्वत: कोणतीही कारवाई न करता नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत केले. लग्न पुढे ढकलता येईल, असा कार्यक्रम आहे. त्याबाबत नागरिकांनी निर्णय घ्यावा, त्याचबरोबर संबंधित कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अंत्यसंस्कारालाही शक्‍य असल्यास जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरोना प्रतिबंधाबाबत प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती देण्यासाठी ते आज पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बिअर बार, मोठी हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगल कार्यालय बंद केली आहेत. लग्नासाठीही दहा व्यक्तींचे बंधन घातले आहे; परंतु लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यासारखा आहे, त्यामुळे नागरिकांनी असे कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत निर्णय घ्यावा. अंत्यसंस्कार हा भावनिक विषय आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतेही बंधणे घातलेली नाहीत; परंतु संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जेवढी गर्दी कमी होईल, तेवढे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शक्‍य तेवढी गर्दी कमी होईल याबाबत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्णय घ्यावा.''

Coronavirus : त्यांचा अहवाल आला; सातारकरांनाे आता सर्व काही तुमच्यावरच अवलंबून

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अतिश दाभोलकर यांना चिरमुले पुरस्कार जाहीर

आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...

 अरेच्चा ! महाराष्ट्रातील ही शाळाच सुरु  

सातारा ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथील श्री गोपालनाथ महाराज मंदिरामध्ये मंगळवारी (ता. 24) होणारा मासिक अमावास्येचा कार्यक्रम व महाप्रसाद रद्द करण्यात आलेला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व यात्रा, उत्सव व तत्सम कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार श्रीनाथ संस्थान व सर्व ग्रामस्थांनी येत्या मंगळवारच्या अमावास्येचे कार्यक्रम व महाप्रसाद रद्द केला आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन श्रीनाथ मंदिरात जमाव अथवा गर्दी करू नये, असे आवाहन श्रीनाथ संस्थान व ग्रामस्थांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Pump Will be Closed On Sunday Satara