रात्री दीड वाजता पोचले पोलिस अन्‌ थांबली "छम-छम'!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 1 डिसेंबर 2019

नृत्यांगना अश्‍लील हावभाव करीत नृत्य करीत होत्या. तर समोर बसलेले ग्राहक हे मद्यपान आणि धूम्रपान करत पैशांची उधळण करीत होते.

सोलापूर : रात्रीचे दीड वाजले तरी हैदराबाद रोडवरील रसिक ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेली "छम-छम' गुन्हे शाखेच्या पथकाने थांबविली. शनिवारी रात्री छापा टाकून ही कारवाई केली आहे. यात पोलिसांनी नऊ नृत्यांगनासह 33 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मद्यपान आणि धूम्रपान करत पैशांची उधळण 
मार्केट यार्ड परिसरातील रसिक ऑर्केस्ट्रा बार रात्री उशिरापर्यंत चालत असून याठिकाणी नृत्यांगना अश्‍लील नृत्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बंडगर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या वेळी काही नृत्यांगना या अश्‍लील हावभाव करीत नृत्य करीत होत्या. तर समोर बसलेले ग्राहक हे मद्यपान आणि धूम्रपान करत पैशांची उधळण करीत होते. पोलिसांनी या ठिकाणी नृत्य करणाऱ्या नऊ नृत्यांगना, याठिकाणी असलेले 14 ग्राहक, तेथे सेवा देणारे हॉटेलचे नऊ कर्मचारी तसेच रसिक ऑर्केस्ट्रा बारचा मालक अशा एकूण 33 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑर्केस्ट्रा बारमधून पोलिसांनी रोख रक्कम, बिअरच्या बाटल्या, सिगारेट पाकीट असा एकूण 23 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या हाताला हिसका देऊन  सांगोल्यात आरोपी पळाला

यांनी केली कारवाई 
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन बंडगर, सहायक फौजदार सुहास आखाडे, पोलिस हवालदार बाबर कोतवाल, पोलिस नाईक योगेश सावंत, सचिन होटकर, संदीप जावळे, विनायक बर्डे, प्रवीण मोरे, दत्तात्रय कोळेकर, गणेश शिंदे, अश्रुभान दुधाळ, सुनीता जाधव, लक्ष्मी पवार, संजय काकडे यांनी बजावली. 

हेही वाचा : प्रेयसीचा गळा दाबून खुनाचा  प्रियकराने केला प्रयत्न

पोलिसांनी पकडलेले हे आहेत आरोपी 
हॉटेल मॅनेजर कुमार गणपत जाधव (रा. लिमयेवाडी), सचिन राऊत (रा. मडकी वस्ती), कामगार रामसेवक वर्मा, डीजे म्युझिक ऑपरेटर महेश माने, कामगार मसरुर आलम, वेटर रागीब आलम, शाहबाज खान, पूर्णचंद्र महापात्रा, इमरान आलम (सर्व रा. हॉटेल रसिक, सोलापूर), ग्राहक अंबादास ईश्‍वरकट्टी (रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी), भोलेनाथ चौगुले (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ), अमित सोनसळे (रा. मराठा वस्ती, भवानी पेठ), संतोष अक्कल (रा. यशवंत हौसिंग सोसायटी, कुमठा नाका), प्रथमेश नामा (रा. सी ग्रुप, सागर चौक), साईराम बिर्रु (रा. जोडभावी पेठ), मल्लिकार्जुन बाळी (रा. मोदीखाना), विष्णुपंत गुरव (रा. विजयालक्ष्मी नगर, अक्कलकोट रोड), अनवीरप्पा बाळी (रा. पूर्व मंगळवार पेठ), यल्लादास वन्नाल (रा. दाजी पेठ), दिलीप रांदड (रा. देसाईनगर, लातूर), समीर शास्त्री (रा. केशवनगर, लातूर), ईश्‍वर माने (रा. हरवाडी, लातूर), गणेश भोसले (रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात पोलिस मुख्य आरोपी ऑर्केस्ट्रा बारचा परवानाधारक रईस म. शफी टिनवाला (रा. शेळगी, सोलापूर) याचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action on the orchestra bar