जामीनासाठी जंग जंग पछाडले; पोलिसांनी त्याला दाखविले लॉकअप

जामीनासाठी जंग जंग पछाडले; पोलिसांनी त्याला दाखविले लॉकअप
Updated on

कोरेगाव : येथील दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेतील बहुचर्चित अपहाराच्या सव्वादोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित व या पतसंस्थेचा माजी अध्यक्ष राजेंद्र हिरालाल गांधी (रा. कोरेगाव) यास अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे "कोरोना'च्या लॉकडाउनने फरारी मासा जाळ्यात अडकल्याची चर्चा कोरेगावात रंगली होती.
 
राजेंद्र गांधीने गुन्हा दाखल झाल्यावर जामीन मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर तो फरारी होऊन वेळोवेळी ठिकाणे बदलत होता; परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे तो कोरेगावातील त्याच्या घरी बंद खोलीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवारी (ता.9) त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील आझाद चौकातील दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेचा माजी अध्यक्ष राजेंद्र हिरालाल गांधी (रा. कोरेगाव) याच्याविरुद्ध डिसेंबर 2017 मध्ये प्रा. विश्वास बर्गे (रा. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420, 406/34 सह एमपीआयडी कलम तीन अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक म्हेत्रे व त्यानंतर निरीक्षक चुडाप्पा यांनी केला. सध्या निरीक्षक सुनील गोडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र गांधी व उपाध्यक्ष भगवान शिर्के यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोघेही फरारी झाले होते.

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

दरम्यान, भगवान शिर्के यास जानेवारी 2020 मध्ये अटक झाली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. दरम्यान, राजेंद्र गांधी हा कोरेगाव येथे आल्याची माहिती मिळताच निरीक्षक गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत साबळे, केशव फरांदे, प्रमोद जाधव, किशोर भोसले, अजय लांडे, रूपाली शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजेंद्र गांधी याला त्याच्या घरातील एका बंद खोलीतून अटक केली. या प्रकरणातील संशयितांनी आतापर्यंत साडेतीन कोटींची फसवणूक करून ठेवी हडप केल्याचे जबाब 30 साक्षीदारांनी पोलिसांना दिले आहेत. निरीक्षक गोडसे व सहायक फौजदार साबळे अधिक तपास करत आहेत. 

दुसरा गुन्हा 31 कोटींचा
 
दरम्यान, राजेंद्र गांधी, भगवान शिर्के, विलास शिंदे व संचालक मंडळातील अन्य सदस्यांनी ठेवीदारांच्या ठेवी व त्यावरील होणारे व्याज मिळून 30 कोटी 78 लाख 47 हजार 306 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद अतिरिक्त लेखापरीक्षक राणी घायताडे यांनी ऑगस्ट 2019 मध्ये दिली असून, या गुन्ह्याचा तपास सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याची माहिती कोरेगाव पोलिसांनी दिली.

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

फेसबुक पोस्टमुळे घडले "महाभारत'

गावातच चिकनच्या पिशव्या घरपोच मिळू लागल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com