esakal | निपाणीकरांसाठी अनोखी कारवाई; पोलिसांकडून जोर-बैठकांचा प्रसाद

बोलून बातमी शोधा

null

निपाणीकरांसाठी अनोखी कारवाई; पोलिसांकडून जोर-बैठकांचा प्रसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : लॉकडाउन काळात विनाकराण फिरणाऱ्यांवर शहरात बुधवारी (२८) प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. दंडात्मक कारवाईसह काहींच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. काही जणांना जोर-बैठका काढायला लावून समज देण्यात आली.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने बुधवारी (२८) पासून १४ दिवसांसाठी लॉकडाउन जारी करण्यात आला. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. मात्र त्यानंतर विनाकराण फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरु केले आहे. गतवर्षी पोलिसांनी लॉकडाउन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद दिला होता. यंदा मात्र अद्याप तरी पोलिसांनी खाक्या दाखविण्यास सुरुवात केलेली नाही. तरीही लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करत प्रशासन अॅक्शन मूडमध्ये आले असल्याचा संदेश दिला आहे.

शहरात सरकारी आदेशानुसार सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. या दरम्यान पोलिस, पालिका व तहसील प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मात्र तहसील, पालिका व पोलिस प्रशासनाने विनाकराण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु करून घरीच थांबण्याचे आवाहन केले. बसस्थानक परिसर, बसवेश्वर सर्कल, अक्कोळ कॉर्नरसह वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. यात मोटारसायकली जप्त करणे, दंड आकारण्यासह जोर-बैठका काढायला लावून पुन्हा बाहेर न फिरण्याची ताकीद देण्यात आली. कारवाईचे व्हीडीओ सोशल मिडीयासह व्हायरल होत असल्याने शहर परिसरात कारवाईची चर्चा सुरु झाली. तहसीलदार प्रकाश गायकवाड, नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर, पोलिस उपनिरीक्षक अनिता राठोड यांच्यासह अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना समज दिली.

हेही वाचा: धक्कादायक! कोरोना उपचारास 4 ते 7 दिवसांचा विलंब ठरतोय मृत्यूचे मुख्य कारण

"लॉडकडाउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून संसर्ग टाळावा. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहील."

- अनिता राठोड, पोलिस उपनिरीक्षक, निपाणी