esakal | विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijeet Bichukale Top Breaking News In Marathi Stories

निवडणुकीच्या निकालानंतर एक महिन्याच्या आत सर्व उमेदवार आपला खर्च सादर करतात. त्यानुसार निवडणूक विभागाकडे उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13 लाख 42 हजार 306 रुपये खर्च झाला आहे. विधानसभेच्या उमेदवारांना 28 लाखांची खर्च मर्यादा होती. जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, महेश शिंदे, मकरंद पाटील, दिगंबर आगवणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले व दीपक पवार यांनी 20 लाखांवर खर्च झाल्याचे म्हटले आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असला तरी शासन दरबारी प्रत्येक उमेदवाराने सादर केलेला खर्च किती, याची उत्सुकता सर्वच मतदारांना आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एक महिन्याच्या आत सर्व उमेदवार आपला खर्च सादर करतात. त्यानुसार निवडणूक विभागाकडे उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे. चुरशीच्या लढती झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी सर्वाधिक खर्च केला असेल असे सर्वांचे म्हणणे आहे. पण, प्रत्यक्ष मिळालेल्या माहितीनुसार कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर आहेत.

हेही वाचा : महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

या निवडणुकीत मनोज घोरपडे यांनी अपक्ष निवडणूक लढूनही 26 लाख 94 हजार 086 रुपये खर्च दाखविला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटील यांनी 16 लाख 96 हजार तर शिवसेनेचे धैर्यशील कदम यांनी 21 लाख 12 हजार रुपये खर्च दाखविला आहे. माण मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी 20 लाख 24 हजार 211 रुपये, शेखर गोरे यांनी 19 लाख 98 हजार 969 रुपये, तर प्रभाकर देशमुख यांनी 12 लाख 83 हजार 638 रुपये खर्च दाखविला आहे. तसेच कऱ्हाड दक्षिणमध्ये कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी 20 लाख 13 हजार 240 रुपये, भाजपच्या अतुल भोसले यांनी 17 लाख 80 हजार 395 रुपये तर अपक्ष उदयसिंह पाटील यांनी 16 लाख 50 हजार 216 रुपये खर्च दाखविला आहे.

अवश्य वाचा :  #MondayMotivation एकीचे बळ 
 
या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादीचे अमोल मेटकरी यांच्या सभा जिल्ह्यात झाल्या. या सभांचा खर्चही दाखविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा खर्च भाजपच्या पाच उमेदवारांकडून प्रत्येकी तीन लाख 41 हजार 917 रुपये दाखविला असून, त्यांची रक्कम 17 लाख नऊ हजार इतकी होते. तर खासदार शरद पवार यांच्या सभेचा खर्च बाळासाहेब पाटील यांच्याकडे 56 हजार 969, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, सत्यजितसिंह पाटणकर व दीपक पवार या प्रत्येकाने 45 हजार 784 रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे. अमोल कोल्हेंच्या सभेचा खर्च फलटणला एक लाख 65 हजार 338, पाटणला 25 हजार रुपये, कऱ्हाड उत्तरला 22 हजार 614, कोरेगावला 13 हजार 95 रुपये दाखविण्यात आला आहे. अमोल मेटकरींच्या सभेचा खर्च कऱ्हाडला 72 हजार 487 रुपये, पाटणला 25 हजार रुपये दाखविण्यात आला आहे.

हेही वाचा : कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लागले आहेत निवडीचे वेध 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेचा खर्च माणच्या शेखर गोरेंनी दाखविला आहे. तो सहा लाख 34 हजार 435 इतर असून, दिवाकर रावतेंच्या सभेचा खर्च 12 हजार 600 रुपये झाल्याचे म्हटले आहे. तर अतुल भोसले यांनी अमित शहा यांच्या सभेचा खर्च 92 हजार 748 रुपये दाखविला आहे. फलटणला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचा खर्च तीन लाख 76 हजार 177 रुपये दाखविला आहे. पाटणला आदित्य ठाकरेंच्या सभेचा खर्च सात हजार 85 रुपये झाल्याचे शंभूराज देसाई यांच्या खर्चात म्हटले आहे. 

अभिजित बिचुकले व अन्य प्रमुख उमेदवारांचा खर्च 

सातारा-जावळी मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले 20 लाख 71 हजार 887, दीपक पवार-20 लाख पाच हजार 951, अभिजित बिचुकले- नऊ हजार 85.
कोरेगाव ः शशिकांत शिंदे- 17 लाख 54 हजार 913, महेश शिंदे- 20 लाख 90 हजार 986.
वाई : मकरंद पाटील- 23 लाख दोन हजार 447, मदन भोसले- 18 लाख 85 हजार 905.

हे वाचाच : कोल्हापूरपेक्षा या गावात मटणाचा दर जादा 

कऱ्हाड उत्तर : बाळासाहेब पाटील- 16 लाख 96 हजार 268, मनोज घोरपडे- 26 लाख 94 हजार 86, धैर्यशील कदम- 21 लाख 12 हजार 610.
कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण-20 लाख 13 हजार 240, उदयसिंह पाटील- 16 लाख 50 हजार 216, अतुल भोसले-17 लाख 80 हजार 395.
पाटण : शंभूराज देसाई-19 लाख 15 हजार 728, सत्यजितसिंह पाटणकर- 13 लाख 42 हजार, 306.
माण : जयकुमार गोरे-20 लाख 24 हजार 211, शेखर गोरे-19 लाख 98 हजार 969, प्रभाकर देशमुख-12 लाख 83 हजार 638.
फलटण : दीपक चव्हाण-19 लाख आठ हजार 990, दिगंबर आगवणे- 22 लाख 92 हजार 351. 
या निवडणुकीत साताऱ्यातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी नऊ हजार 785 रुपये खर्च केले आहेत.
(आकडेवारी संदर्भ : निवडणूक विभाग, सातारा)