कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलणार ?

Possibility of Change in Power in Kolhapur Zilla Parishad
Possibility of Change in Power in Kolhapur Zilla Parishad

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनंतर मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विधानसभेला मैदान मारल्याने काँग्रेस - राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच बळावर युतीकडून जिल्हा परिषदेतील सत्ता खेळण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसाच बेबनाव राहिला तर जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्हा परिषदेत सध्या भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य शक्ती, शिवसेना यामध्ये घाटगे गट व सत्यजित पाटील गटाचा समावेश आहे. तर विरोधात काँग्रेस - राष्ट्रवादी शिवसेनेतील प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांचा गट एकत्र आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता काठावरच्या संख्याबळावर  भाजप - शिवसेना, मित्र पक्षाकडे आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीला धोबीपछाड मिळाल्याने आघाडीचा विश्वास दुणावला आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यात वाद निर्माण झाल्याने, हा वाद आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. 

सद्यस्थितीत पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष (१४ ),जनसुराज्य शक्ती ( ६), शिवसेना (७ यामध्ये नरके ३ सत्यजित पाटील सरूडकर २ व डॉ.मिणचेकर १)ताराराणी आघाडी (३ महाडिक), युवक क्रांती आघाडी (२) ,स्वाभिमानी शेतकरी संघटना (२), आवाडे गट (२), अपक्ष( १) . असे एकूण संख्याबळ ३७ इतके आहे.

काँग्रेस आघाडी
काँग्रेस ( १४ पैकी २ रेश्‍मा राहुल देसाई व सचिन बल्लाळ गत अध्यक्ष निवडीस गैरहजर.) राष्ट्रवादी ११ ( गत अध्यक्ष निवडिस १ गैरहजर विजय बोरगे) . प्रा.संजय मंडलिक व उल्हास पाटील गट( ३ ). आमदार प्रकाश आबिटकर व दिनकरराव जाधव यांची शाहू आघाडी( २).

युतीमधील नाराज घटक

  •  स्वाभिमानी शेतकरी संघटना (२),
  •  प्रकाश आवाडे गट (२),
  •  डॉ सुजित मिणचेकर गट (१), 
  •  सत्यजित पाटील गट (२), 
  •  अपक्ष रसिका पाटील(१).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com