चोरट्याने खाल्ले कोंबड्यांचे खाद्य

poultry food theft incidence in aajra kolhapur marathi news
poultry food theft incidence in aajra kolhapur marathi news

आजरा (कोल्हापूर) ः साळगाव (ता. आजरा) येथील पोल्ट्रीतून 87 हजारांचे साहित्य चोरीला गेले. याबाबत पोल्ट्री मालक राजू लक्ष्मण केदारगोळ (रा. साळगाव, ता. आजरा) यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

आजरा-पेरणोली रस्त्यालगत केदारगोळ यांची 5 हजार पक्ष्यांची पोल्ट्री आहे. गुरूवारी (ता. 9) केदारगोळ पुणे येथे गेले होते. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी जाळी कट करून व दरवाजाची कडी उचकटून भांडी, इन्व्हरटर बॅटरी, जाळीचे बंडल, ताडपत्री, पाईपचे बंडल, ब्रुडर असे 87 हजारांचे साहित्य चोरून नेले. दोन महिन्यापूर्वी पेरणोली येथे दीपक सावंत व काका देसाई यांच्या पोल्ट्रीतून प्रत्येकी 20 पिशव्यांची चोरी केली होती. पेरणोली परिसरात पोल्ट्री खाद्याची सातत्याने चोरी होत असल्याने व्यावसायिक हवालदिल आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com