esakal | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग हिटणी फाट्यावर कारची झाडाला धडक: चालक गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारची झाडाला धडक ;चालक गंभीर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारची झाडाला धडक ;चालक गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हिटणी फाट्यानजीक रस्ता उतारावरील धोकादायक वळणावर मंगळवारी (ता. ६) रात्री 9 च्या सुमारास चिक्कोडी येथून संकेश्वरकडे निघालेल्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. यामध्ये चालक के. शशीकुमार (वय 32, मुळगाव चेन्नई, सध्या रा. संकेश्वर) हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर संकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,

कारचालक के. शशीकुमार हे चिक्कोडी येथे लग्न सोहळ्यासाठी आपल्या कारने गेले होते. कार्यक्रम आटोपून ते संकेश्वरकडे परतत होते. तवंदी घाट उतारावरील धोकादायक हिटणी फाटा वळणावर आले असता त्यांचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जोराने जाऊन आदळली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला तर के. शशीकुमार यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक प्रकाश बामणे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविले.

हेही वाचा- विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू;निपाणीतील घटना : हेस्कॉमचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

जखमी के. शशिकुमार हे कणगला येथील हिंदुस्तान लेटेस्ट कंपनीत सेवेत आहेत.दरम्यान घटनास्थळी संकेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणपती कोगेनहळी यांनी भेट देऊन पाहणी केली.रात्री उशिरा या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

loading image