डावच मोडला ! तीन पाणी, रमी जुगार खेळणाऱ्या क्‍लबवर छापा

डावच मोडला ! तीन पाणी, रमी जुगार खेळणाऱ्या क्‍लबवर छापा

मुरगूड  ( कोल्हापूर) - महाराष्ट्र - कर्नाटक सीमारेषेवर असलेल्या अर्जुनी (ता. कागल) येथे रस्त्याकडेला सुरु असलेल्या तीन पाणी आणि रमी जुगार खेळणाऱ्या क्‍लबवर मुरगूड पोलिसांनी छापा टाकला. यात एक लाखांच्या रोख रकमेसह 5 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 11 दुचाकीसह 26 मोबाईलचाही समावेश आहे. या प्रकरणी 38 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

अर्जुननगर, अर्जुनी (ता.कागल ) येथील पापलेट क्रीडा आणि सास्कृतिक मंडळाचे इमारतीमध्ये करमणुकीचा परवाना असताना बेकायदेशीररीत्या पैसे लावुन रमी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने काल (गुरुवार) सायंकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत दोन्ही जुगार अड्डयावर छापा टाकला. यामध्ये तीन पाणी जुगाराचे 4,650 रुपयांची रोख रक्कम 6 मोबाईल आणि एक दुचाकी असा 56 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.तर याच गावात रमी जुगार खेळणाऱ्याक्‍लबवर देखील पोलिसांनी छापा टाकून 32 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांकडून 97 हजार 850 रुपयांच्या रोख रकमेसह 4 लाख 96 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 20 मोबाईल आणि 10 दुचाकींचा समावेश आहे. 

या 38 जणांवर कारवाई

नवलकुमार पिसुत्रे (रा.निपाणी ), उत्तम आनंदा खोत (रा.खडकेवाडा ), अनिल महादेव शिंदे (रा.कोल्हापुर), रामदास दत्तात्रय तोरसे (रा.खडकेवाडा ), योगेश नवलकुमार पिसुत्रे, भरत शामराव सातवेकर (रा.अर्जुनी ), हणमंत तातोबा कलकुटकी (रा. कोल्हापूर), अशोक बाळु माने (रा. निपाणी ), इम्तीहाज अब्दुल मस्जीद मुरसल (रा संकेश्वर ), वैभव विलास सुतार (रा. खडकलाट ), विजय शंकर जाधव (रा.शिवाजी नगर निपाणी), काशीनाथ बाळु डोनगे (रा. खडकलाट ), विनायक धोंडीराम दाभोळे (रा.शाहनगर निपाणी ), अजित धनपाल मगदुम (रा. खडकलाट ), अशोक धोंडी पाटील (रा.कोडणी ), संजय कल्लाप्पा खोत (रा. बुदीहाळ ), उदय विलास माने (रा. निपाणी), कृष्णात बंडा शिंदे (रा.हणबरवाडी ), सुभाष ज्योती मगदुम (रा.आडी ), संजय कृष्णा मोरे ( रा. यमगर्णी ), बाळासाहेब मल्लाप्पा आवटे (रा.भोज ), निशीकांत आण्णाप्पा कुरळुपे, सिध्दाप्या लगमण्णा हडकर (दोघेही रा. अक्कोळ ता. निपाणी), किशोर शंकर कोरवी (रा.कोरवी गल्ली निपाणी ), प्रकाश आप्पाजी चौगले (रा.खडकलाट ), बाबासाहेब आणगोंडा पाटील ( रा.खडकलाट ), भाऊसो सुरेश नाईक (रा. नाईक गल्ली गडहीग्लज ), कृष्णात रामचंद्र मांगोरे ( रा. पिंपळगाव ), जगदीश आप्पासो केसरकर (रा.बोळावी ), म्हाळु रामा पिसुत्रे (रा. यमगर्णी),मारुती दत्ता सातवेकर ( रा. गायकनवाडी ),शंकर काळु फराकटे ( रा.निपाणी) आदी 38 जणांवर कारवाई केली आहे. मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com