अवकाळी पावसाचा ऊस तोडणीवर परिणाम; 25 टक्के पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

ऊस तोडणीला विलंब होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अवकाळी पावसाचा ऊस तोडणीवर परिणाम; 25 टक्के पिकांचे नुकसान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबरच रब्बी हंगामासाठी पेरण्यात आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवारात पाणी साचल्याने अनेक भागातील ऊस तोडणीही ठप्प झाली आहे. बेळगाव जिल्हात दुबार आणि तिबार पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी केल्यानंतर विविध भागांतील शेतकरी वाटाणा, मसूर, मोहरी, हरभरा, जोंधळा, गहू, ज्वारी आदी प्रकारची पिके घेतात.

भात व इतर प्रकारच्या पिकांची कापणी झाल्यानंतर जिल्ह्यातील 25 टक्के शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसाच्या संततधारेमुळे शिवारात पाणी साचल्याने पिक कुजून गेले असून पाऊस कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. शिवारातील पाणी लवकर कमी न झाल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार असून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अवेळी पडलेल्या पावसामुळे फटका बसला आहे. ऊस तोडणीला विलंब होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: काँग्रेसचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे : रामदास आठवले

"दिवाळीनंतर अनेक ठिकाणी ऊस तोडणीचे काम सुरू झाले होते. सध्या शिवारातून जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे उसाची वाहतूक करणे अवघड असल्याने ऊस तोडणीला विलंब होणार आहे."

- पांडुरंग फौंडेकर, शेतकरी

"धामणे, वडगाव आदी भागातील अनेक लोकांनी भात पेरणीनंतर वाटाणा व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसामुळे पिक वाया गेले असून शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्याबाबत प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे."

- अमित कोमानाचे, शेतकरी

हेही वाचा: 'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

loading image
go to top