
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला गती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी उचल जाहीर करीत ऊसदराची कोंडी फोडली. त्यानंतर जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखाना आणि श्री ‘दत्त इंडिया’नेही दर जाहीर केला. अन्य कारखानदारांच्या भूमिकेकडे उत्पादकांचे लक्ष आहे. ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.