धक्कादायक! रेशनवर खराब डाळीचे वितरण; ऐतवडे बुद्रुकातील प्रकार उघडकीस

वितरण बंद करण्याचे आदेश
धक्कादायक! रेशनवर खराब डाळीचे वितरण; ऐतवडे बुद्रुकातील प्रकार उघडकीस

कुरळप : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे स्वस्त धान्य दुकानातून (ration stoar) निकृष्ट डाळीचे वाटप केल्याचा प्रकार दक्षता कमिटीने उघडकीस आणला. पुरवठा विभागाशी चर्चा केली असता वाटपासाठी आलेलीच डाळ वितरीत करीत आहोत, असे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी निकृष्ट डाळीबाबत आमदार मानसिंगराव नाईक (mansingrav naik) यांना माहिती दिली. त्यांनी आरोग्याला (health) त्रासदायक ठरू शकणारी डाळ वितरित करू नका, असे आदेश दिलेत.

लॉकडाउनमधील (lockdown) अडचणींचा विचार करून शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वितरण सुरू आहे. जनतेला वितरित करण्यात येत असलेली हरभरा डाळ निकृष्ट असल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आज ऐतवडे बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानातून डाळीचे वितरण सुरू झाले. कोरोना विषाणू संसर्गावर (corona-19) नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी केल्यामुळे रोजगार बंद पडून गरिबांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन शासनाने स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय केसरी आणि दारिद्र रेषेखालील शिधापत्रिकांवर एक किलो हरभरा डाळीचे मोफत वितरण सुरू केले.

धक्कादायक! रेशनवर खराब डाळीचे वितरण; ऐतवडे बुद्रुकातील प्रकार उघडकीस
ऑक्सिजनचे संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे ऑक्सिजनअभावी निधन

वाटपासाठी आलेली डाळ निकृष्ट अहे. गुरांना घालण्यासारखी नाही. डाळीचा दर्जा खालावला असताना किडलेल्या डाळीचे प्रमाण व खड्यांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले. जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. जनतेकडून शासन प्रति रोष व्यक्त केला जात आहे. स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट डाळीचे मोफत वाटप होत असल्याने शिधापत्रिकाधारकांना डाळ वाटप करण्यात आली.

"स्वस्त धान्य दुकानात वितरीत केलेली खराब डाळ संबंधित दुकानदारांना तात्काळ बदलून द्यावी याबाबत वाळवा तहसिलदारांना सांगितले आहे. तशा सूचना तहसीलदारांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत."

- मा. नसिंगराव नाईक, आमदार

"जुनी डाळ खराब होती ती संबंधित दुकानदारांना वाळवून वाटण्यास सांगितले होते. महाराष्ट्रात वाटपाचे आदेश नसल्याने डाळ जास्त दिवस गोदामात राहिली. त्यामुळे खराब झाली आहे. यापुढे येणारे धान्य चांगल्या दर्जाचे असेल."

- बबन करे, पुरवठा अधिकारी

धक्कादायक! रेशनवर खराब डाळीचे वितरण; ऐतवडे बुद्रुकातील प्रकार उघडकीस
''अशोक चव्हाण वेड पांघरुण पेडगावला जाऊ नका'; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com