esakal | RCU Belgaum Exam - परीक्षा तोंडावर; विद्यार्थी गोंधळात
sakal

बोलून बातमी शोधा

RCU Belgaum Exam - परीक्षा तोंडावर; विद्यार्थी गोंधळात

RCU Belgaum Exam - परीक्षा तोंडावर; विद्यार्थी गोंधळात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाच्या (RCU) पदवी व पदव्युत्तर परीक्षांना २६ जुलैपासून प्रारंभ होत आहे. सध्या मागील सेमिस्टरच्या परीक्षांचे आयोजन विद्यापीठाने केले असले तरी पुढील सेमिस्टरसाठी ऑनलाईन वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे. परीक्षा अवघ्या दहा दिवसांवर परीक्षा आल्याने विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना मागील सेमिस्टरचे ऑनलाईन वर्ग (online) घेण्याची सूचना करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे.

विद्यापीठाने मार्चमध्ये पदवीच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या तसेच पदव्युत्तरच्या पहिल्या व तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षांचे आयोजन केले होते. मात्र, परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन व कोरोनामुळे सदरच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यापीठाने पदवीच्या दुसऱ्या, चौथ्या व पाचव्या तसेच पदव्युत्तरच्या दुसऱ्या व चौथ्या सेमिस्टरचे ऑनलाईन क्लासेस सुरु केले आहेत. सध्याही हे ऑनलाईन वर्ग सुरुच आहेत. सध्या राज्यात कोरोनाची (covid-19) रुग्ण संख्या कमी झाल्याने विद्यापीठाने आठ दिवसांपूर्वी गत सेमिस्टरच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही पुढील सेमिस्टरचे ऑनलाईन क्लासेस सुरुच असल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. पुढील सेमिस्टरचे वर्ग सुरु असूनही विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतोय. याचा विचार विद्यापीठाने करावा अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे.

हेही वाचा: आता चहा ठरणार 'गुणकारी'; लहान मुलांवरील संशोधनात मोठं यश

परीक्षा जवळ असतानाही अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोरोना लसीकरण करुन घेतलेले नाही. विद्यापीठाने लसीकरण किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना माघारी फिरावे लागत आहे. विद्यापीठात गुरुवारी (ता. १५) लसीकरण शिबीर राबविण्यात आले. तसेच विविध महाविद्यालयातही लसीकरण सुरु आहे. पाऊस तसेच बसेसच्या समस्येअभावी विद्यार्थ्यांना जाताना अडचणी येत आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयीने विद्यार्थ्यांसाठी शहरातच लसीकरणाचे आयोजन करावे, अशी मागणीही होत आहे.

loading image