नकार देताच गळा दाबून प्रेयसीचा खून

तात्या लांडगे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- पोलिसांनी खाक्‍या दाखवताच प्रियकराची कबुली
- विवाहानंतर प्रेमसंबंधास नकार दिल्याचा राग
- 31 ऑक्‍टोबरच्या घटनेचा पोलिसांकडून तपास

सोलापूर : दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या विवाहीत प्रेयसीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने संतप्त प्रियकाराने गळा दाबून खून केल्याची घटना सोलापूरात घडली. 31 ऑक्‍टोबरला प्रियंका गोडगे या विवाहीतेचा खून झाला होता. या खूनाची कबुली संशयित राजू श्रीकांत शंके यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून प्रियंका व राजू यांच्यात प्रेमसंबंध होते. विवाहानंतर प्रियांका राजूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यावरुन चिडलेल्या राजूने दिवाळीनिमित्त माहेरी आल्यानंतर दमाणी नगरातील रेल्वे रुळाशेजारी बोलावून प्रियंकाचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

अरे बापरे..! महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर "पॉर्न व्हिडीओ'

काय घडलं 31 ऑक्‍टोबरला
प्रियांकाच्या मुलीला कफ झाल्याने ती वाफ देण्यासाठी दवाखान्यात ये- जा करीत होती. प्रियांकाला बोलण्याचा प्रयत्न करुनही राजूला तिने बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यावरुन चिडलेल्या राजूने प्रियांकाला भेटण्यासाठी गुरुवारी 31 ऑक्‍टोबरला यशनगर येथे रेल्वे लाईनजवळ बोलावून घेतले. दरम्यान प्रियांका उशीर होऊनही घरी न आल्याने तिच्या आई- वडिलांची चिंता वाढली होती. दरम्यान, राजूने प्रियांकाचे वडील गोविंद कृष्णा चवरे यांना फोन करुन त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी प्रियांका चिखलात निपचित पडली होती. त्यानंतर प्रियांकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. त्यावेळी प्रियांकाच्या वडिलांनी राजू शंके याने मुलीचा खून केल्याची फिर्याद दिली. सुरवातीला पोलिसांनी एकतर्फी प्रेमातून खून केल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. मात्र, आता पुढील तपासात विवाहानंतर प्रेमसंबंधास नकार दिल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लग्नाआधीच "ही' अभिनेत्री आहे प्रेग्नंट?

वडील म्हणतात महाविद्यालयापासूनच त्याचा त्रास
प्रियांका हिचा काही वर्षांपूर्वी परांडा तालुक्‍यातील साकत येथे तुकाराम गोडगे यांच्याशी विवाह झाला. प्रियांका विवाहानंतर अधूनमधून माहेरी यायची. राजू तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा, घरीही यायचा, महाविद्यालयात शिकतानाही त्याने तिला त्रास दिला होता. त्यावेळी राजूच्या कुटुंबीयांना सांगून त्याला ताकीद दिली होती. एकतर्फी प्रेमातून राजूने प्रियांकाला संपविल्याची फिर्याद वडील गोविंद कृष्णा चवरे यांनी पोलिसांत दिली होती.

 

पोलिस निरीक्षक म्हणाले...
आरोपीच्या जबाबानुसार प्रियांका आणि राजू या दोघांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून प्रेमसंबंध होते. राजू व मृत प्रियांकाचा भाऊ प्रसाद दोघे मित्र होते. त्यानिमित्ताने राजूचे प्रियांकाच्या घरी ये-जा सुरु होती. विवाहानंतर प्रेमसंबंधास नकार दिल्यानेच राजूने प्रियांकाचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
- संजय साळुंखे, पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refusal to have a love affair after marriage; The murder of a lover