काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पोलिस मुख्यालय समोरील दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातील कुलूप तोडून कॅश काऊंटरमधील 47 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सांगली : येथील पोलिस मुख्यालय समोरील दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातील कुलूप तोडून कॅश काऊंटरमधील 47 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसाद चिंतामणी दातार (वय 52, रा. विश्रामबाग) यांनी फिर्याद दिली. 

हेही वाचा - शपथविधीसाठी या दाम्पत्याला मातोश्रीवरून निमंत्रण 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी

प्रसाद दातार हे कलावती अपार्टमेंट, ज्ञानेश्‍वर चौक, एसटी कॉलनी येथे राहतात. त्यांचे पोलिस मुख्यालयासमोर व्हिजन नावाचे चष्माचे दुकान आहे. लिमये हॉस्पिटल परिसरातील  त्यांचे दुकान आहे. सोमवारी (ता.25) रात्री आठच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील कॅश काऊंटरमधील 47 हजार रुपयांची रोकड घेवून ते पसार झाले. 

हेही वाचा - सोन पावलांनी आली... दागिने घेऊन गेली...! ; कसे ते जरूर वाचा 

मंगळवारी चोरीचा प्रकार उघडकीस

दरम्यान, मंगळवारी (ता.26) सकाळी साडेसातच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याचे दातार यांना समजले. ते तातडीने दुकानात आले. त्यावेळी दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. याबाबतची माहिती विश्रामबाग पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery In Shop Near Police Headquarter In Sangli

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: