दांडेलीत "कोरोना'बाधित आढळल्याची अफवा

Rumor has it that Corona was found in Dandeli
Rumor has it that Corona was found in Dandeli
Updated on

दांडेली (बेळगाव) : चीनमधून आलेली व्यक्‍ती कोरोना व्हायरसबाधित असून त्याला हुबळीतील किम्स रुग्णालयात दाखल केल्याची अफवा पसरताच दांडेली, हल्याळ व जोयडा तालुक्‍यांत खळबळ माजली. सय्यद इस्माईल (वय 31, रा. गांधीनगर, दांडेली) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या रक्‍ताचे नुमने घेतले. परंतु, वैद्यकीय अहवालात कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तत्पूर्वी, दांडेलीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सय्यदच्या घरी तसेच जुने दांडेली येथे त्याच्या आई-वडिलांकडे चौकशी केल्यानंतर त्याला किम्स रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी किम्स रुग्णालयाशी संपर्क साधून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. सय्यद हा चीनमधील शांघाय प्रांतात दोन वर्षांपासून काम करत आहे. 5 फेब्रुवारीस तो किम्स रुग्णालयात घशाचा आजार असल्याचे सांगून ऍडमिट झाला. त्यामुळे त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. पण, वैद्यकीय अहवालात कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सय्यदवर उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याची माहिती किम्सच्या वैद्याधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे दांडेलीतील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 9) सय्यदची भेट घेतली. 

शांघाय येथून बॅंकॉकमार्गे बंगळूरला आल्यानंतर घशात त्रास जाणवू लागला. त्यामुळे स्थानिक डॉक्‍टरांकडून उपचार घेऊनही त्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे किम्स रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी काही चाचण्याही केल्या; पण कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून आपण तणावमुक्‍त झालो असल्याचे माहिती सय्यदने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. 

परिसरातील लोकांची तपासणी 
कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे दांडेली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सय्यद याच्या घरातील तसेच आजूबाजूच्या सर्व लोकांची आरोग्य तपासणी केली. तसेच याबाबतचा अहवालही जिल्हा आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही दिला. अहवालात सय्यदला कोरोनाची लागण झाली नसल्याचेही नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com