esakal | 'मराठा समाज न कळलेला माणूस मुख्यमंत्री झाला, तरचं समाजाचं भलं होईल'
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठा समाज न कळलेला माणूस मुख्यमंत्री झाला, तरचं समाजाचं भलं होईल'

'मराठा समाज न कळलेला माणूस मुख्यमंत्री झाला, तरचं समाजाचं भलं होईल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : मराठा समाजात जन्म न घेतलेला आणि ज्याला मराठा समाज (maratha community) कळलेला नाही असा माणूस ज्या दिवशी मुख्यमंत्री (CM maharashtra) होईल त्यादिवशीच मराठा समाजाचं भलं होईल असं मत शेतकरी नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी आज व्यक्त केले. यावेळी त्यांनी येत्या सोमवारी राज्यव्यापी 'माझं अंगण माझं रणांगण' आंदोलन (protest for maratha reservation) करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला.

ते म्हणाले, 'शेतकरी नेते शरद जोशी म्हणायचे, (sharad joshi) ज्या दिवशी शेतीतले न कळणारा मुख्यमंत्री होईल तेव्हा शेतकऱ्यांचे (farmers) भले होईल. तसंच मराठा समाजाचे भले कधी होईल? ज्याने मराठा समाजात जन्म घेतलेला नाही. ज्याला मराठा समाज कळलेला नाही असा माणूस मुख्यमंत्री होईल तेव्हाच मराठा समाजाचे भले होईल. खेडापाड्यातला गरीब मराठ्याला पुढे येऊ द्यायचे नाही म्हणूनच इथल्या सुभेदार मराठ्यांनी त्यांना आरक्षणापासून आजवर वंचित ठेवले आहे. या प्रस्थापित सुभेदारांमुळेच मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द झाले.

हेही वाचा: अत्याचार करून खून करणाऱ्या अल्पवयीन मुलास सक्तमजुरी

मराठा समाजाच्या सरदारांनी मराठा समाजाचे नुकसान केले. शिंदे, पाटील, चव्हाण, पवार या प्रस्थापितांनी लाभ घेतला. मात्र गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते मोठे होतील या भीतीने त्यांना आरक्षण देत नाहीत. राजकारणामध्ये जे मराठे आहेत ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे. त्यांना भीतीने ग्रासलेले आहे. या सरदारांनी मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राह्मण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले. ज्या पद्धतीने फडणवीस यांना कोंडीत पकडले त्याच माणसाने आरक्षण दिले. ते या महाविकास आघाडी सरकारला टिकवता आला नाही."

ते म्हणाले, "रयत क्रांती संघटनेच्यावतीने (rayat kranti sanghatana) येत्या सोमवारी (१०) सकाळी सात ते एक वाजेपर्यंत 'माझे अंगण हेच रणांगण' हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात 'मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधले काठीला, महाविकास आघाडी सरकार निघालं काशीला' अशी घोषणा असेल. वंचित मराठा समाज काठीला दप्तर बांधून दारात उभा राहतील. सरकारचे खंडणी गोळा करून झाले आहे. एकप्रकारे मराठा समाजाची सरदारांनी फसवणूक केली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत सर्व सवलती सरकारने द्याव्यात. त्यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करावी. यासाठी हे आंदोलन असेल."

हेही वाचा: जर्मनीचं कोरोनाविरोधी लढाईचं सूत्र; 'सेव्हन डे इन्सिडन्स'

पुढे ते म्हणाले, "नवाब मलिक (navab malik) हे काही नेते नाहीत. ते राष्ट्रवादीचे गुलाम आहेत. गुलामाला स्वतःचे मत नसते. ते खरे तर शाहिस्तेखानच आहेत. त्यांनी आमच्या मराठा समाजाची काळजी करु नये. मराठा समाज लढून मिळवणारा आहे. ते म्हणतात, की फडणवीसांनी नेमलेला गायकवाड आयोग चुकीचा आहे असं न्यायालय म्हणते. मग तुम्ही इतकी वर्षे काय शेण्या वळत होतात का? तुम्हाला ते आधी कळलं नाही का? ’’