संभाजी भिडे यांनी मंत्री स्मृती इराणी यांना दिले रायगडला येण्याचे निमत्रण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

""संभाजी भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरुवर्य आहेत. दोघांनी संघात एकत्र काम केले. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे मोठे कार्य सुरु आहे. त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत.''  

- स्मृती इराणी

सांगली - केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. श्री. भिडे यांनी त्यांना राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथे जिजाऊंच्या समाधीस्थळी येण्याचे निमंत्रण दिले. श्री गणपतीची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. 

विराट कोहलीला जायचंय दुर्गराज रायगडावर; संभाजीराजेंपुढे व्यक्त केली इच्छा 

आज भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी श्रीमती इराणी आल्या होत्या. मारुती चौकात सभा झाल्यानंतर त्यांनी श्री. भिडे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. गाड्यांचा ताफा गावभागातील श्री. भिडे यांच्या निवासस्थानाकडे गेला. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपच्या नेत्या नीता केळकर उपस्थित होत्या. 

Vidhan Sabha 2019 : कोकणात मुलांच्या भविष्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा 

श्री. भिडे यांनी त्यांना रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनासाठीही येण्याचे निमंत्रण दिले. श्रीमती इराणी म्हणाल्या,""संभाजी भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरुवर्य आहेत. दोघांनी संघात एकत्र काम केले. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे मोठे कार्य सुरु आहे. त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत.''  

कोल्हापूर विमानतळावरील ‘नाइट लॅंडिंग’चे काय झाले?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Bhide gives Minister Smriti Irani an invitation to come to Pachad