esakal | सांगलीत ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत ‘चोर’ गणपती

सांगलीत ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना परिस्थितीमुळे यंदा गणपती पंचायतन संस्थानचा गणेशोत्सवही साधेपणाने सुरू झाला. कोरोनामुळे उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय गणपती पंचायतन ट्रस्टने घेतला आहे. चोर गणपतीची आज प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. चोर गणपतीला सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे. मंदिर बंद असल्याने केवळ पूजा-अर्चा केली जाते.

हेही वाचा: Solapur : रेल्वे स्थानकावर दागिने चोरणारा कर्नाटकातून जेरंबद

संस्थान गणेशोत्सवाचा दरवर्षी शाही माहौल असतो. प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या तीन दिवस आधी प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन्‌ गेला याची भाविकांना माहितीही होत नाही. विघ्नहर्त्याला ‘चोर गणपती’ म्हणण्याची प्रथा रूढ आहे. गणपती मंदिरात पहाटे साधेपणाने चोर गणपतीची प्रतिष्ठापना पुजारी व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.

प्रतिष्ठापना झाल्यानंतरच दरवर्षी दरबार हॉलमध्ये संस्थानचा उत्सव सुरु होतो. यंदा सण, उत्सव, सोहळ्यांवर संक्रांत आली. गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक मंडळांनीही डामडौल रद्दचा निर्णय घेतला. संस्थान गणपतीच्या शाही मिरवणुकीलाही यंदा फाटा देण्यात आला आहे.

हेही वाचा: वडणगेत कचऱ्या‍चा प्रश्‍न गंभीर; ढीगाऱ्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त

पर्यावरणपूरक मूर्ती

प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना झाली. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली. तेंव्हापासून ती तशीच आहे. केवळ रंगरगोटी केली जाते. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. भाविकांना हात लावून दर्शन घेता येते. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येते, अशी माहिती पुजारी रमेश पाटणकर यांनी दिली.

loading image
go to top