संगमनेर मर्चंटस बॅंकेला मिळाला मानाचा हा पुरस्कार 

संगमनेर मर्चंटस बॅंकेला मिळाला मानाचा हा पुरस्कार 

संगमनेर ः सहकारी बॅंकिंगच्या क्षेत्रात अतिशय मानाचा, मुंबई येथील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बॅंक्‍स असोसिएशनच्यावतीने दिला जाणारा कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील पुरस्कार, सोमवार (ता. 10) रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात संगमनेरच्या मर्चंटस्‌ बॅंकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व गृहमंत्री अनिल देशमुख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

बॅंक असोसिएशनच्या वतीने आयोजित उत्कृष्ट नागरी सहकारी बॅंकांच्या स्पर्धेत नाशिक विभागातून 100 ते 500 कोटींपर्यंत ठेवी असणाऱ्या बॅंकांमधून ही निवड करण्यात आली. 

पारदर्शी कारभाराला श्रेय 
या बद्दल बोलताना बॅंकेच्या लोकाभिमुख, पारदर्शी व वेगवान कारभाराला याचे श्रेय दिले आहे. बॅंकेवर गेली 54 वर्षे विश्वास दाखविणारे सभासद, कर्जदार, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, कार्यक्षम अधिकारी व कर्मचारी तसेच एकदिलाने काम करणारे संचालक मंडळ यांच्या कार्याला मिळालेली पावती म्हणजे हा पुरस्कार असल्याची भावना व्यक्त केली आहे. 2018 - 2019 या आर्थिक वर्षात बॅंकेने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीवर या पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले. 

आतापर्यंत दहा पुरस्कार 
मागील आठ वर्षात मिळालेल्या विविध 10 पुरस्कारांनी बॅंकेच्या वैभवशाली कारकीर्दीला अधिक झळाळी लाभल्याची भावना बॅंकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेश मालपाणी यांनी व्यक्त केली. बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे हे यश असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. 

यांनी स्वीकारला पुरस्कार 
बॅंकेच्या वतीने माजी अध्यक्ष श्रीगोपाल पडतानी, उपाध्यक्ष सतीश लाहोटी, डॉ. संजय मेहता, ओंकार सोमाणी, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेश मालपाणी, प्रकाश राठी, राजेंद्र वाकचौरे, सुनील दिवेकर, ओंकार बिहाणी, गुरुनाथ बाप्ते, प्रकाश कलंत्री, सीए संजय राठी, सीए जितेंद्र लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम, आयटी. मॅनेजर विठ्ठल कुलकर्णी आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com