Wildcat News
esakal
बहे (सांगली) : बहे आणि हुबालवाडी गावाच्या शिवेवर असलेल्या डांगबाबा शिंदे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना आज दुपारी मजुरांना ऊसाच्या फडात तीन लहान पिल्ली आढळली. ही पिल्ले बिबट्याची असावीत, अशी चर्चा शेतकऱ्यांत झपाट्याने पसरली. मात्र वन विभागाने (Forest Department) केलेल्या तपासणीनंतर ती पिल्ले रानमांजराची असल्याचे निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.