Sangli Crime : सांगलीत रिलायन्स ज्वेलरी सशस्त्र दरोडा; कोट्यावधीचे सोने लुटले Sangli Crime Armed robbery Reliance Jewels Sangli Crores worth gold looted | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Crime

Sangli Crime : सांगलीत रिलायन्स ज्वेलरी सशस्त्र दरोडा; कोट्यावधीचे सोने लुटले

Sangli Crime - येथील वसंतदादा मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेलरी या सराफी पेढीवर आज सशस्त्र दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिस असल्याचा बनाव करून पेढीत शिरलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून,

तोंडावर चिकटपट्टी लावून कानपटीवर बंदूक ठेवत दागिने, हिरे आणि चोख सोन्यावर दरोडा टाकला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर फोडून टाकत पुरावे नष्ट करण्याचा असफल प्रयत्न केला. भर दुपारी तीन वाजता अर्धा तास हा भयानक प्रकार घडला. त्याची माहिती मिळताच सांगली हादरून गेली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली मिरज रोडवरील मार्केट यार्डनजीक वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेलरी पेढी आहे. दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीतून सुमारे आठ ते दहाजण दुकानात ग्राहक म्हणून आले.

त्यातील चौघेजण दुकानाच्या बाहेर थांबले. सहाजण दुकानात शिरले. त्यावेळी दुकानात काही ग्राहक खरेदीसाठी आले होते. दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश  केल्यानंतर ‘आम्ही पोलिस आहे, तपासणी करायची आहे’, असे म्हणून बंदुक बाहेर काढली.

दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना एका जागी उभा केले. कामगार आणि ग्राहकांचे हातपाय बांधले. तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर दुकानात, शोकेस, लॉकर, डिस्प्लेला लावलेले दागिने व हिरे काढून एका मोठ्या पिशवीत भरले.

हे सर्व सुरू असतानाच एक ग्राहक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो पडला आणि जखमी झाला. त्या ग्राहकाच्या दिशेने दरोडेखोराने गोळीबार केला. त्याची पुंगळीही त्याठिकाणी पडली होती. दुकानातील सर्व सोने लुटून दरोडेखोरांनी एका गाडीतून पलायन केले. दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली.

चोवीस तास वर्दळ असणाऱ्या या भागात अक्षरशः कायदा सुवव्यस्थेचे धिंडवडे निघाले. पोलिस मुख्यालयाजवळ ही घटना घडल्याने पोलिसांची नाचक्की झाली. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासो जाधव, प्रवीण गिल्डा यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक, दोन पोलिस ठाण्याचे निरीक्षक दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला. नेमके किती सोने चोरीला गेले, याची चौकशी उशीरापर्यंत सुरु होती.

असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. सहाजणांकडे बंदुक असल्याचे त्यांनी पाहिले आहे. त्यातील एकाने गोळीबार केला. सुमारे पंधरा जणांची ही टोळी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Mumbai Newscrimegold