सांगली डॉट कॉम; जनतेला गृहित धरू नका, हाच संदेश !

भाजपने मात्र एक नगरपंचायत आपल्याकडे घेऊन आपले अस्तित्व पुन्हा दाखवले
 Politics
Politicssakal

सांगली जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस महत्वाचा ठरला. संपूर्ण राज्यातील निकालात सर्व माध्यमांचा फोकस होता तो रोहित आर. आर. पाटील यांच्यावर ! कवठेमंकाळ नगरपंचायत (Nagar Panchayt)राज्यात गाजली. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव आणि कवठेमंकाळ या शहरांतील त्यांच्या गटाचा प्रभाव कमी झाला असावा, असा अंदाज करून विरोधकांनी त्यांच्या विरोधात चक्रव्यूह रचला होता. त्यांनी एकाकी पाडले होते. पण, नुकताच सज्ञान झालेल्या 23 वर्षाच्या रोहित यांना हलक्यात घेणे खासदार संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि ज्यांची पूर्वापार सत्ता चालत आली आहे अशा सगरे गटाला चांगलेच महागात पडले. एखाद्या उदयन्मुख नेतृत्वाला हलक्यात घेणं महागात कसे पडू शकते, याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आर.आर. पाटील यांच्याकडून अनेकदा पराभूत झालेल्या खासदार पाटील आणि घोरपडे यांना हा पराभव जिव्हारी लागणारा आणि आयुष्यभर लक्षात राहील, असाच आहे.

 Politics
पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव

कवठेमहांकाळमध्ये आर. आर. यांच्या गटाला डावलून बाकी सगळे एकत्र आले तर सहज जिंकू, अशी मांडणी केली गेली. ती यशस्वी झाली असती, मात्र रोहित एकाकी पडल्याचा संदेश जोरात गेला. त्यांनी पक्षाला महत्व दिले आणि राष्ट्रवादीचे पॅनेल मैदानात उतरवले. या अनपेक्षित निर्णयाने जयंत पाटील देखील बुचकळ्यात पडले. एकीकडे रोहित आणि दुसरीकडे लोकनेते राजारामबापूंचा गट असलेले सगरे. या युद्धापासून जयंतराव दूरच राहिले. येथे त्यांनी एकही सभा घेतली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र रोहित एकटे पडणार नाहीत, आम्ही त्यांना ताकद देऊ, असे जाहीर सांगून बळ दिले होते. त्यात रोहित यांच्या भाषणातील धार वातावरण तयार करायला उपयुक्त ठरले. आर. आर. यांच्याइतकेच वक्तृत्व लाभलेल्या रोहितने ‘मी पंचवीस वर्षाचा होईतोपर्यंत विरोधकांकडे काहीच शिल्लक ठेवत नाही’, अशी आर. आर. स्टाईल तोफ डागली. हे भाषण खूप गाजले. जी अपेक्षित हवा निवडणुकीला आवश्यक असते ती हवा या एका वाक्याने केली. रोहित यांना मिडियाने आणि पाठोपाठ मतदारांनी डोक्यावर घेतले. कसून टीमवर्क झाले. कोणीही दिग्गज प्रचारात नसताना तरुण कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेला हा विजय राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यामध्ये नवं नेतृत्व निर्माण करणारा ठरेल.

 Politics
उद्योजकांचा सूर, औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाला मेट्रोचा होईल फायदा

या घडीला काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या सर्वच पक्षातून एक पिढी वार्धक्याकडे जात असताना दुसऱ्या पिढीचा उदय होत आहे. त्यात प्रतीक जयंत पाटील, प्रभाकर संजय पाटील, राजवर्धन अजितराव घोरपडे, सुहास अनिल बाबर, वैभव सदाशिवराव पाटील, सम्राट नानासाहेब महाडिक आदी नावे लक्षवेधी ठरतात. विश्वजीत कदम, सत्यजित देशमुख, विशाल पाटील, संग्रामसिंह देशमुख ही नवी जनरेशन कार्यरत झालेली आहे. यामध्ये रोहितने चमत्कार करून दाखवला. आबांच्या पश्‍चात त्यांच्या चिरंजीवाचे राजकीय लाँचिंग दणकेबाज झाले.

कडेगावच्या निकालाने पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील नव्या दिशेच्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. येथे राष्ट्रवादी स्वतंत्र वाट तुडवू पहात आहे. कुंडलचा लाड गट आधी देशमुखांसोबत होता. पदवीधरला त्यांनी कदमांचा हात पडकला. आता जयंतरावांच्या नेतृत्वावात येथे राष्ट्रवादी स्वतंत्र चूल मांडू पहात आहे. अर्थात, हे सारे फक्त लाडांना बळ देण्यासाठी नसून जयंतरावांना कुठेतरी विश्‍वजीत यांचा वारू रोखायचा असावा, अशी राजकीय कुजबूज होत असते. त्यातूनच कडेगाव नगरपंचायतीत आघाडीतील बिघाडीचा फटका विश्वजित यांना बसला. येथे देशमुखांना एखाद्या विजयाची गरज होती, तो मिळाला. या निकालाचा अन्वयार्थ विश्वजीत कदम समजून घेतील आणि दुरुस्तीही करतील. कडेगाव देशमुखांचे होम ग्राऊंड. तिथेच कदम यांनी त्यांना रोखले होते. आता बॅकफुटवर चाललेल्या संग्राम व पृथ्वीराज यांना दिलासा मिळाला आहे. भाजपच्या बेरजेत वाढ झाली आहे.

 Politics
उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, की केजरीवालांची ऑफर स्वीकारणार? लवकरच स्पष्ट

खानापूर नगरपंचायत मात्र निकाल अपेक्षित असाच आला आहे. येथे सत्ताधाऱ्यां‍यांच्या हाती पुन्हा एकदा सत्ता सोपवली आहे. आमदार अनिल बाबर आणि विश्वजीत कदम यांनी शिवसेना व काँग्रेसची केमिस्ट्री येथे चांगली जमवली. राष्ट्रवादीने येथे बिघाडी करूनही बाबर यांनी आपला गड राखला आहे. बड्या नेत्यांवर गंभीर आरोप करत राज्यभर चर्चेत असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना भोपळाही फूटत नाही. सुहास शिंदे यांच्यासारखे नवे नेतृत्व येथे घडते आहे.

एकंदरीत या तीन नगरपंचायतीच्या तीन तऱ्हेच्या राजकारणातून भविष्यातील राजकारणाच्या दिशांवर भाष्य केले आहे. जयंतरावांचा भाजपशी असलेला स्नेह अजून टिकून आहे. त्यांच्या वर्तुळातील घोरपडे, संजय पाटील असे नेते आहेत. ते त्यांच्या विरोधात जात नाहीत, असे निरीक्षण समोर येते. इस्लामपुरात वेगळे धोरण, महापालिका क्षेत्रात त्याहून वेगळे धोरण आणि अन्य निवडणुकात तिसरे धोरण असे एकंदरीत पालकमंत्र्यांची रणनिती दिसते आहे. आता काँग्रेस आणि शिवसेना पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या या बदलत्या जयंतनीतीला कसे तोंड देते, यावर भविष्यातील राजकारणाची दिशा असणार आहे. भाजपने मात्र एक नगरपंचायत आपल्याकडे घेऊन आपले अस्तित्व पुन्हा दाखवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com