
1️⃣ सांगलीतील मिरज येथे पोलिसांनी १ कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला.
2️⃣ या प्रकरणातील मुख्य आरोपी कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार इब्रार इनामदार आहे.
3️⃣ हवालदाराने आपल्या चहाच्या दुकानात कलर झेरॉक्स मशीनवर बनावट नोटा छापल्या.
सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये पोलिसांनी तब्बल एक कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या नोटा कोल्हापूर पोलिस दलातील एक हवालदार छापत असल्याचे समोर आले आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हवालदारसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा तब्बल एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.