Tukaram Mundhe effect on Food and Drug Administration action
esakal
सांगली : अन्न-औषध प्रशासनाने कमी मनुष्यबळातही कारवाईचा धडाका लावला असून, त्यामुळे अन्न भेसळ करणारे आणि प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या चार महिन्यांत या विभागाने विविध कारवायांमध्ये तब्बल ४१ जणांना गजाआड केले (41 arrested in Sangli food adulteration crackdown) आहे. ३४ आस्थापनांना सील ठोकले आहे. जिल्ह्यात आयुक्त तुकाराम मुंडे यांचा ‘इफेक्ट’ जोरदार दिसून येत आहे. सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे आणि सहायक आयुक्त नीलेश मसारे यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्ह्यात या कारवाया करण्यात आल्या आहेत.