fuel shortage rumors in Sangli
esakal
सांगली : आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार, अशी अफवा पसरली आणि अचानक जिल्हाभर पंपांवर रांगा (Sangli Fuel Panic) लागल्या. वाहनांच्या टाक्या फुल्ल करून घेण्यासाठी एकच धावपळ उडाली. पंपावरील इंधन संपले आणि ‘बंद’चे फलक लागले. परिणामी, लोक आणखी अवस्थ झाले आहेत.