बापरे ! प्रत्येकाचा कान राहणार बिझी

Sangli Human Health Ear Machine Effect Sangli Marathi News
Sangli Human Health Ear Machine Effect Sangli Marathi News

सांगली :  स्मार्ट फोन तळहातावर आले आणि सोबतच डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाणही वाढले. ते आता केवळ डोळ्यापुरते मर्यादित न राहता त्याची वाटचाल गतीने कानाकडे सुरू झाली आहे. सन 2022 पर्यंत जवळपास सर्व स्मार्टफोन युजर्सच्या कानाला मशीन असेल , अशी बाजारस्थिती आहे. अर्थात, हे मशीन "कर्णबधिर'साठीचे नव्हे तर अत्याधुनिक प्रणालीने युक्त यु-ट्यूब, इअरफोनचे असणार आहे. सन 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये या उपकरणाची उलाढाल दुपटीहून अधिक वाढली आहे. 2018 मध्ये ती 7.8 मिलियन डॉलर होती आणि 2022 मध्ये ती दुप्पट होईल, असा अंदाज विविध सर्वेक्षणातून समोर आला आहे. 

स्मार्ट फोन, संगणक, लॅपटॉप आदींच्या वाढत्या वापराचा थेट परिणाम या मार्केटवर झाला आहे. याआधी केवळ गाणी ऐकण्यासाठी उपयोगात येणारे हे उपकरण "दररोज दीड जीबी डाटा' या भारतात सध्या डोक्‍यावर घेतल्या गेलेल्या फंड्यामुळे विक्रीच्या उच्चांकी पातळीकडे वाटचार करत आहे. जागतिक बाजाराने 2017 ते 2024 ही वर्षे या बाजारासाठी सर्वाधिक बुस्टर देणारी असतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. "रिसर्च नेस्टर'च्या अहवालानुसार आशियाई देशात हा बाजार सर्वाधिक वेगाने वाढतो आहे. त्यातही वायरलेस ब्लू-टूथ बाजाराने मोठीच उडी घेतली आहे.

या उपकरणाचे अधिक भोक्ते 
 
या जागतिक अहवालांना सांगलीशी जोडून पाहताना इथला बाजार त्याच वेगाने धावत असल्याचे चित्र समोर येते. मोबाईलवर सिनेमा पाहणे, वेब सिरीज पाहणे, जीममध्ये व्यायाम करताना गाणी ऐकणे, स्वयंपाक करताना वायरलेस ब्लूटूथ वापरणे, दोन्ही हातांनी सतत कामात व्यस्त असणारे (उदा. वाहन चालक, दुकानदार आदी) असे घटक हे या उपकरणाचे अधिक भोक्ते असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा - विना-अनुदानित सिलिंडर महागला
 
ब्लूटूथ इअरफोनचे प्रकार 

ब्लूटूथ इअरफोनचे तीन प्रकार आहेत. इन इअर (कानाच्या आतमध्ये बसणारे), ओव्हर इअर (कानापासून काही अंतरावरील) आणि ऑन इअर (कानालगत पण वरील बाजूस). त्यात कानात आतमध्ये बसवण्याच्या उपकरणाची मागणी सातत्याने अग्रस्थानी राहिली आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत डोक्‍यावरून दोन्ही कानांना जोडणाऱ्या ब्लूटूथला मोठी मागणी होती, त्यात आता घट झाली आहे. एकूणच हा बाजार दिवसेंदिवस वाढतोय आणि कानात मशीन म्हणजे अपमान ठरणारा काळ मागे पडतो... अर्थात, ही मशीन कमी ऐकू येते म्हणून नसली तरी तिच्या अतिवापराने त्याचा धोका मात्र नक्की आहे. 

मार्केटची स्थिती 

ग्रॅंड व्ह्यू रिचर्सच्या अहवालानुसार सुमारे 50 टक्के खरेदी ही ऑनलाईन बाजारातून होत असून 30 टक्के खरेदी मल्टिब्रॅंडेड दुकानातून तर 20 टक्के खरेदी ही स्वतंत्र एक्‍सक्‍लुझिव्ह स्टोअरमधून केली जात आहे. हा जगभरातील ट्रेंड आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com