esakal | सांगलीत पुन्हा कठोर निर्बंध; वाचा काय सुरु, काय बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत पुन्हा कठोर निर्बंध; वाचा काय सुरु, काय बंद?

सांगलीत पुन्हा कठोर निर्बंध; वाचा काय सुरु, काय बंद?

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढ कायम असल्याने रोखण्यासाठी १४ ते १९ जुलै या कालावधीत निर्बंध कठोर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला. जिल्ह्यातील रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्री, भाजी विक्री, सायकल चालविण्यासह शहरी आणि ग्रामीण भागातील आठवडा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य आदेशानुसार फक्त आरटी-पीसीआर चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटिव्हीटी रेट निश्चित करण्याच्या आदेश आहेत. ९ जुलै रोजी संपलेल्या आठवड्याचा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. तसेच शासन आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात येणार्‍या निर्बंधांविषयी निर्णय घेत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लगतच्या दोन आठवड्यातील चाचणीचा पॉझिटिव्हीटी दर विचारात घ्यावा, असे आदेश दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेश १९जुलै रोजीचे पहाटे पाच वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा: 'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

रस्त्याकडेला खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होवून कोविड नियमांचे उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे सदर आस्थापना बंद करण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी नसलेल्या कोणत्याही ठिकाणी (उदा. रस्ता, फुटपाथ) कोणत्याही प्रकारचे साहित्य / पदार्थ विक्रीस पूर्णपणे प्रतिबंध असेल. जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंड्या सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार पूर्णपणे बंद राहतील.

भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना फक्त अधिकृत भाजीमंडईमध्ये अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेने निर्धारित केलेल्या स्वतंत्र जागेमध्ये विक्रीस बसण्यास परवानगी असेल. भाजी व फळ विक्रेते यांनी शक्यतोवर घरपोच सेवा द्यावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने योग्य ते नियोजन करावे. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असणार्‍या वस्तू सबंधित आस्थापनेकडून घरपोच देणेबाबतची व्यवस्था करावी. सदर बाबत स्थानिक स्वराज्य संस्थेने योग्य ते नियोजन करावे.

हेही वाचा: बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

एका हॉल अथवा कार्यालयामध्ये एकच लग्नसमारंभ २ तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत जास्तीत जास्त २५ व्यक्ती किंवा नातेवाईकांचे उपस्थितीत करणेस परवानगी आहे. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध राहणार आहे. याशिवाय किराणा दुकान, दुध डेअरी, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या ठिकाणी गर्दी केल्यास दंडाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.

loading image