गुंड धर्मराज चडचन याचा एन्काऊंटर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पोलीस निरीक्षक श्रीशेल यांनी  पथकासह तेथे छापा टाकला. यावेळी धर्मराज याच्या टोळीने पोलिसांच्यावर गोळीबार केला.

सांगली -  विजापूर जिल्ह्यातील चडचन गावामध्ये गुंड धर्मराज चडचन याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. गुंड धर्मराज याच्याकडे अवैध पिस्तुल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीशेल यांनी मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक श्रीशेल हे छापा टाकण्यासाठी तेथे गेले असता धर्मराज यांच्या टोळीने पोलिसांच्यावर गोळीबार केला. त्यात पोलीस निरीक्षक श्रीशैल हे जखमी झाले. या घटनेने चडचन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, 

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चडचन हे गाव आहे. येथे गुंड धर्मराज चडचन यांच्याकडे अवैध पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलीस निरीक्षक श्रीशेल यांनी  पथकासह तेथे छापा टाकला. यावेळी धर्मराज याच्या टोळीने पोलिसांच्यावर गोळीबार केला. त्यास प्रतिउत्तर म्हणून पोलीसांनीही गोळीबार केला. यात गुंड धर्मराज याचा मृत्यू झाला आहे. गुंडांच्या टोळीने केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक हे जखमी झाले, पोलीस निरीक्षक श्री शैल याच्यावर कर्नाटकातील विजापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Sangli News Enconter in Vijapur District