...अन् सांगलीकरांची माणूसकी आली धावून

विजय लोहार
Wednesday, 9 September 2020

 कोरोनामुळे नॉन कोव्हीड रुग्णांच्या  मृतदेहाकडे शंकेने बघितले जात आहे.

नेर्ले (सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत झालेली व्यक्ती कशामुळे मरण पावली याची लोकांमध्ये चर्चा सुरू आहेत. यामध्ये कोरोनाच्याच धास्तीने अनेकांचे मृत्यू झाल्याचे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. त्यामुळे मयत झालेल्या कुटूंबियांना मदत करण्यासाठी कोणीही धाडसाने समोर येत नाही. परंतु नेर्ले येथे माणुसकी जोपासणारी घटना घडली. 

नेर्ले येथे पाहुण्यांच्या घरी वृध्देचा ह्दयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. ही वृद्धा गुढे (ता. पाटण, जि. सातारा) येथील होती. 
त्या नेर्ले येथे पाहुण्यांच्या घरी आल्यानंतर काळाने त्यांच्यावर घाला घातला. डोळ्यादेखत झालेला मृत्यूनंतर त्या महिलेच्या पाटण तालुक्यातील गुढे या गावी मृतदेह कसा न्यायचा हा प्रश्न समोर निर्माण झाला. इस्लामपूर, कराड आदी भागातील रुग्णवाहिका चालकांना संपर्क साधला असता रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे ते कुटूंबीय पुन्हा हादरून गेले. त्यांनी रुग्णवाहिका कशी उपलब्ध करायची याबाबत येथील जमीर नदाफ याच्याशी बोलणे केले. सांगली प्रहार जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांना येथील सामाजिक कार्यकर्ते विजय लोहार आणि संतोष खरमाटे यांनी संपर्क साधला. स्वप्निल पाटील यांनी प्रहार संघटनेची मोफत रुग्णवाहिका एका तासात उपलब्ध करून दिली. रुग्णवाहिका घेऊन चालक बंटी नांगरे पाटील नेर्लेत  दाखल झाले. रुग्णवाहिका दारात पोहचताच महिलेचा मृतदेह तिच्या गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आला. यावेळी गहिवरलेल्या बाया बापूड्यांनी प्रहार संघटनेचे आभार व्यक्त केले
.

हे पण वाचासांगली : बोरगाव गावावर शोककळा ; दोन दिवसात चार जणांचा कोरोनाने मृत्यू

 कोरोनामुळे नॉन कोव्हीड रुग्णांच्या  मृतदेहाकडे शंकेने बघितले जात आहे. त्यामुळे मृतदेहासह कुटूंबियांचे हाल होत आहेत. परंतु या कुटूंबियांना दिलासा देण्यासाठी प्रहार संघटना चोवीस तास उपलब्ध आहे. 

-स्वप्निल पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना सांगली जिल्हा

हे पण वाचा - पुढील उपचारासाठी राजू शेट्टी पुण्याला रवाना

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli prahar sanghatana help to dead body