esakal | सांगली: फळपीक विम्यासाठी १२ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली: फळपीक विम्यासाठी १२ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

सांगली: फळपीक विम्यासाठी १२ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्ह्यातील मृग बहरातील फळपिकासाठी १२ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. पीक कर्जदार आणि बिगर कर्जदार, अशा शेतकऱ्यांनी विम्यापोटी शेतकऱ्यांनी ५ कोटी ९१ लाख २४ हजार ७१६ रुपये इतकी रक्कम भरली आहे, अशी माहिती संबंधित विभागातून देण्यात आली. गेल्या दोन वर्षांत भरपाई न मिळाल्याने अल्प प्रतिसाद मिळतो आहे.

हेही वाचा: एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे. नुकसान झाले तर, त्याचे पंचनामे होऊन, त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जातो. त्यानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. पीक विम्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाने गावागावात जनजागृती केली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक डाळिंब पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी विमा भरतात. यंदाच्या हंगामात जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात १२ हजार १७८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला असून, ९ हजार ०११ हेक्टरवरील पिकांना विमा देऊन संरक्षित केले आहे.

हेही वाचा: Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांत मृग बहरातील डाळिंब पिकासह अन्य फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे देखील करण्यात आले. परंतु नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या मृग बहरात शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेण्यासाठी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेतला असला तरी, नुकसान झाले तर भरपाई मिळणार का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

तालुकानिहाय फळ पीकविमा भरलेले शेतकरी

तालुका शेतकरी संख्या

आटपाडी ५,१३९

जत ६,६१७

कडेगाव ०३

कवठेमहांकाळ ३५९

खानापूर २७

मिरज ०६

पलूस ०२

तासगाव २५

एकूण १२,१७८

loading image
go to top