सांगली : पावणेदोन हजार हेक्टरवर सूर्यफूल

तुरीचीही ९ हजार हेक्टरवर पेरणी
sunflower
sunflowersakal

सांगली : गेली आठवडाभराच्या पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील उर्वरित पेरण्या पुन्हा गतीने सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवडाच्या अखेरीस ६७ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जत तालुक्यात सूर्यफुलाचे क्षेत्र ४२७ हेक्टर अपेक्षित असताना एक हजार ७२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण साडेतीन पटीने क्षेत्र वाढले आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र ८ हजार ९०० हेक्टर होते. प्रत्यक्षात ९ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जत तालुक्यात खरीप क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे.

जूनच्या सुरवातीला पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या; मात्र जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ८४ हजार ४१० हेक्टर क्षेत्र आहे. पैकी १ लाख ९१ हजार ३३२ हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्याचे प्रमाण ६७ टक्के आहे. दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यात ज्वारी, बाजरीचे मोठे क्षेत्र आहे. तेथे बाजरीची ४० हजार २८३ हेक्टरवर पेरणी झाली, परंतु ज्वारी क्षेत्र शिल्लक आहे. शिराळ्यात भाताची १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, दमदार पावसाने चांगली वाढ आहे. नदीकाठावर सोयाबीन ३७ हजार ४२६ हेक्टरवर आणि भुईमुगाची २४ हजार ४२८ हेक्टरवर टोकण पूर्ण झाली आहेत; परंतु पाऊस लांबल्याने बळिराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

शिराळ्यात १६ हजार हेक्टर भाताचे क्षेत्र असून, त्यापैकी १४ हजार ४१० हेक्टरवर लागण झाली. पिकाची वाढ चांगली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाच्या टोकणीला गती आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम भागात दोन्ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सोयाबीनचे ४६ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र असून, ३७ हजार ४२६ हेक्टरवर पेरणी झाली. भुईमुगाच्या ३१ हजार हेक्टरपैकी २४ हजार ४२८ हेक्टरवर टोकण झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यांत ज्वारी, बाजरीचे मोठे क्षेत्र आहे.

ज्वारीचे ५१ हजार ५९४ हेक्टर क्षेत्र असून, अद्याप ११ हजार ८७८ हेक्टरवर पेरणी झाली. बाजरीचे ५५ हजार १८७ हेक्टर क्षेत्र असून, ४० हजार २८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे ३९ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रापैकी २८ हजार ९७३ हेक्टर, मूग ८ हजार तीनशे हेक्टरपैकी ३ हजार ७०२ हेक्टर, उडीद १५ हजार सातशे हेक्टरपैकी १५ हजार २९८, अन्य कडधान्ये ३ हजार ६१ हेक्टरवर पेरणी झाली.

दर तेजीमुळे लागवडीकडे कल...

खाद्यतेलाचे दर तेजीत असल्याने जिल्ह्यात यंदा सूर्यफूल लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. या पिकाचे ५ हजार २०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात १७ हजार ६०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर म्हणजे ३४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे चित्र आहे; मात्र सोयाबीनचे क्षेत्र अपेक्षेपेक्षा घटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com